आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

72. सवजी काकांचे बम्पर दिवाळी गिफ्ट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईच्या हरे कृष्णा एक्सपोर्टस्-किसना डायमंडचे सवजी भाई ढोलकिया यांनी दिवाळी गिफ्ट म्हणून त्यांच्या 491 कर्मचार्‍यांच्या कार, 200 कर्मचार्‍यांना फ्लॅट तर 500 कर्मचार्‍यांना दागिने दिले.

डीबी टेक - नॉलेज पॅकेज (72 वर यासाठी)
दिवाळीच्या उत्सवामध्ये आलेल्या याबातमीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. मालक आणि कर्मचार्‍यांच्या नात्यावर एक नव्या प्रकारे चर्चा या निमित्ताने सुरू झाली. सवजी भाई मिडिया आणि सोशल प्लॅटफॉर्म्सवर हिरो ठरले.
फॅक्ट फाइल
- ढोलकिया सवजी काका या नावाने प्रसिद्ध आहेत. ते गुजरातच्या अमरेली जिल्ह्यातील दुधाला गावचे रहिवासी आहेत.

- सूरतला आलेले सवजी ढोलकिया यांनी 1978 मध्ये हिर्‍याला पॉलीश करण्याचे काम सुरू केले होते. त्यावेळी त्यांचा पगार महिन्याकाठी 169 रुपये होता. तर आज त्यांच्या कंपनीची नेटव्हॅल्यू 6 हजार कोटी रुपये आहे.

- सूरतमध्ये सवजी भाईंनी डायमंड पॉलीशरशिवाय डायमंड ब्रोकर म्हणूनही काम केले.

- उधारीवर मिळवलेले 3900 रुपयांचे भांडवल आणि 15 वर्षांच्या संघर्षानंतर 1992 मध्ये त्यांनी हरे कृष्णा एक्सपोर्टस्ची स्थापना केली.

- अशा प्रकारचे गिफ्ट देण्याची कल्पना ढोलकिया यांना तीन वर्षांपूर्वी आली होती. त्यावेळी त्यांनी 10 कर्मचार्‍यांना कार गिफ्ट केली होती.

- त्यानंतर त्यांनी 100 कर्मचार्‍यांना भेट दिली. 2014 मध्ये एकूण 1321 कर्मचार्‍यांना त्यांनी अशाप्रकारची भेट दिली.

- आपल्या कर्मचार्‍यांना कुटुंबाचा एक भाग मानणारे सवजी भाई म्हणतात की, आम्ही हिरे बनवत नाही, तर आम्ही व्यवसायाच्या माध्यमातून माणूस घडवतो.

- सवजी भाई म्हणतात त्यांची कंपनी सध्या 50 हून अधिक देशांमध्ये डायमंड एक्सपोर्ट करते आणि आणखी 200 देशांमध्ये विस्तार होणार आहे.

- हरि कृष्ण डायमंडचे जगातील सात देशांमध्ये स्वतःचे आऊटलेट्स आहेत. त्याशिवाय जगभरातील 5000 हजार शोरूममध्ये किसना ब्रँडची डायमंड ज्वेलरी उपलब्ध आहे.

- सवजी भाई म्हणतात की, मी माझ्या प्रत्येक कर्मचार्‍याला पाच वर्षांत प्रशिक्षित करतो. त्यांच्यामते त्यांच्या कंपनीत काम करणारे कारागीर आणि डायमंड इंजिनिअर्स यांची सरासरी सॅलरी 1 लाख रुपये आहे.