आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

55. इन्‍फोसिसच्‍या सीईओपदी सिक्‍का

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इन्‍फोसिसचे संस्थापक एन आर नारायण मूर्तिने आपली दूसरी टर्म यशस्‍वी पूर्ण केली. त्‍यानंतर इन्‍फोसिसचा भार विशाल सिक्‍का पेलणार आहेत.

डीबी टेक - नंबर 55 वर यासाठी:

इंन्‍फोसिसची स्थिती खराब होत असताना निवृत्‍त झालेले नारायण मुर्ती जून 2013 मध्‍ये पुन्‍हा कंपनीच्‍या धुरा सांभाळली होती. परंतु पाच वर्ष पूर्ण न करताच एका वर्षांतच त्‍यांनी निवृत्‍ती घेण्‍याची घोषणा केली.

फॅक्‍ट फाइलः
- देशातील अग्रगण्‍य कंपनी इन्फोसिसचे संस्थापक नागराव रामाराव नारायण मूर्ति यांनी कंपनीसाठी महत्‍वाची भूमिका बजावली.

- माहेरवाशीन पोरगी सासरला जात असल्‍या प्रमाणे वाटत असल्‍याचे नारायण मूर्ति यांनी निवृत्‍तीवेळी सांगितले होते.

- 16 तासाहून अधिक वेळ ते काम करत असत. तेव्‍हा परिवाराकडून कंपनी किंवा परिवार अशी विचारणा व्‍हायची.

- इन्फोसिसचे नवीन सीईओ आणि एमडी विशाल सिक्का यांची निवड नारायण मूर्तिं यांनीच केली.

- सिक्का गुजरात मधील बडोदा येथे जन्‍मले आहेत. त्‍यांचे वडिल भारतीय रेल्‍वेमध्‍ये अधिकारी होते.

- सिक्‍कांनी एमएस यूनिवर्सिटी मधून कंप्यूटर इंजीनियरिंग मध्‍ये पदवी मिळविली आहे. त्‍यानंतरच्‍या शिक्षणासाठी ते अमेरिकेला गेले होते. स्टेनफोर्ड यूनिवर्सिटीमधून त्‍यांनी आर्टिफिशियल इंटेलीजेंसमध्‍ये पीएचडी मिळविली.

- शिक्षण सुरु असतानाचा विशाल सिक्का यांनी आय ब्रेन, बोधा डॉट कॉम नावाची कंपनी सुरु केली होती.

- 2007 मध्‍ये ते इन्‍फोसि‍सल जोडल्‍या गेले.

- विशाल सिक्का सदैव मायक्रो ब्‍लॉगिंग साइट ट्विटरवरुन नियमित कर्मचारी, सहकारी यांच्‍याशी कनेक्‍ट राहतात.

- इन्फोसिसची स्थापना 2 जुलै 1981 रोजी पुणे येथे एन आर नारायण मूर्ति आणि त्‍यांच्‍या सहा सहकारी यांनी केली. सहकारी - नंदन निलेकानी, एन एस राघवन, क्रिस गोपालकृष्णन, एस डी.शिबुलाल, के दिनेश आणि अशोक अरोड़ा