आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

65. हे आहे आपले क्रिकेट - श्रीनिवासन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सुप्रीम कोर्टाने बीसीसीआय प्रमुख एन. श्रीनिवासन यांना अध्यक्षपद सोडण्यास सांगितले आहे. मात्र त्यांनी राजीनामा दिलेला नाही. आयपीएल फिक्सिंग प्रकरणी नियुक्त मुदगल समितीच्या अहवालात त्यांच्यावर बोट ठेवण्यात आलेले नाही, आता सर्वकाही सुप्रीम कोर्टाच्या स्वाधीन आहे.

डीबी टेक - नॉलेज पॅकेज (65 वर यासाठी)
आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणी सुरु असलेल्या सुनावणीत सुप्रीम कोर्टाने बीसीसीआयच्या चालकांना फटकारले आहे. तुम्ही बाहेरची घाण साफ करण्याचा प्रयत्न करत आहात, मात्र तुमच्यातच कितीतरी अस्वच्छता साचलेली आहे.

फॅक्ट फाइलः
- पंजाब आणि हरियाणा हायकोर्टचे माजी न्यायाधीश मुकुल मुदगल यांनी आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणी त्यांचा अहवाल 10 फेब्रुवारीला सुप्रीम कोर्टात सादर केला.

- मुदगल समितीच्या अहवालात बीसीसीआय अध्यक्ष श्रीनिवासन यांचा जावई गुरुनाथ मयप्पन आयपीएल सामन्यांदरम्यान सट्टेबाजी करत असल्याचे उघड झाले होते. राजस्थान रॉयल्स संघाचा मालक राज कुंद्राची भूमिका देखील संशयास्पद होती. या दोघांना क्रिकेट बोर्डाने क्लिन चीट दिली होती.

- आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणी मुदगल समितीच्या अहवालावर दुसर्‍या सुनावणीत सुप्रीम कोर्टाने श्रीनिवासन यांनी तत्काळ बीसीसीआय अध्यक्षपदाचा राजीनामा दिला पाहिजे असे सांगितले.

- सुनावणी दरम्यान सुप्रीम कोर्टाने म्हटले, की भारतात क्रिकेट हा धर्माप्रमाणे आहे. बीसीसीआयच्या कारभारात पारदर्शकता असली पाहिजे. जर, फिक्सिंग सारखी किड संपवली नाही, तर हा खेळ संपून जाईल.

- कोर्टाने म्हटले, की जर सामना पाहाण्यास जात असलेल्या प्रेक्षकांना माहित झाले, की मॅच फिक्स आहे तर काय होईल? खेळ हा खेळासारखाच खेळला गेला पाहिजे. त्यातल्या त्यात हा जंटलमॅन गेम म्हणून ओळखला जातो. यातील किड संपवली नाही, तर भविष्यात खेळावर प्रश्नचिन्ह उपस्थित होईल.

- मुदगल समितीने आयपीएल मॅच फिक्सिंगमध्ये श्रीनिवासन यांना क्लिन चीट दिली आहे. त्याच आधारावर श्रीनिवासन बीसीसीआयचे अध्यक्षपदाचे कामकाज पाहाण्याची परवानगी मागण्यासाठी कोर्टात गेले होते, मात्र कोर्टाने त्यांना चांगलेच फटकारले.

- फिक्सिंग प्रकरणी सुप्रीम कोर्टाने गुरुनाथ मयप्पनविरोधात कारवाई झाली पाहिजे, असे स्पष्ट केले आहे. त्याच बरोबर श्रीनिवास यांना देखील इशारा देत चार पर्याय दिले आहेत.