आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

59. इस्रायल-पॅलेस्टाइन संघर्षाचे एक नवे पर्व

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इस्रायलने तीन ज्यू मुलांच्या अपहरण आणि त्यांच्या हत्येचा बदला घेतला. 8 जुलैपासून इस्रायल-हमासच्या संघर्षात गाझापट्टीवर दोन हजारापेक्षा जास्त लोक मारली गेली.

डीबी टेक - क्रमांक 59 वर का;
संघर्ष तीव्र झाला की गाझापट्टीप्रमाणे परिणाम दिसायला लागतात. इस्रायल आणि पॅलेस्टाइन तडजोड करण्‍यास तयार नव्हते. आपल्या नागरिकांचे संरक्षण करणे प्रत्येक देशाची जबाबदारी असते. परंतु याचा अर्थ असा नाही की जगात उघडपणे मोठ्याप्रमाणावर लोकांना मारणे.

फॅक्ट फाइल
  • तीन ज्यू मुले 12 जून रोजी पश्चिम किना-यावरुन गायब झाली होती. त्यांचे अपहरण पॅलेस्टाइन समर्थक हमासने केल्याची बातमी आली. शोध मोहिमेत तिन्ही मुलांचे मृतदेह सापडले. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी म‍ंत्रिमंडळाची विशेष बैठक बोलावून कडक लष्‍करी कारवाई करण्‍याचा निर्णय घेतला.
  • मग एका नव्या संघर्षाची सुरवात 8 जुलै 2014 रोजी इस्रायलने ऑपरेशन प्रोटेक्शन अंतर्गत गाझापट्टीवर असलेल्या पॅलेस्टाइन नागरिकांवर हल्ले सुरु केले.
  • दिवस-रात्र इस्रायलने गाझापट्टीवर बॉम्ब वर्षाव चालवला. यात अनेक निष्‍पाप जीवांचा बळी गेला. ऑक्टोबरमध्‍ये वेगवेगळ्या फे-या आणि इजिप्तच्या मध्‍यस्थीने इस्रायल आणि पॅलेस्टाइनमध्‍ये अनिश्चित काळासाठी शस्त्रसंधी करार झाला. संयुक्त राष्‍ट्राच्या अहवालानुसार 50 दिवसांमध्‍ये पॅलेस्टाइनमध्‍ये 2 हजार 76 लोक मारली गेली.
  • जो पर्यंत इस्रायल गाझावरील आर्थिक नाकेबंदी काढून घेत नाही, तोपर्यंत संघर्ष थांबणार नाही, असे हमासचे नेते खालिद मशाल यांनी सांगितले.
  • इस्रायलच्या हल्ल्यात गाझापट्टीवरील 244 पेक्षा जास्त शाळा उध्दवस्त झाली. आणि जी वाचली त‍िथे 3 लाखपेक्षा जास्त पॅलेस्टाइन नागरिकांनी आश्रय घेतला आहे.