आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Germany Wins 20th FIFA World Cup In Football History

86. जर्मनीने जिंकला 20 वा फीफा फुटबॉल वर्ल्ड कप

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अतिरिक्त वेळेचा पुरेपुर सदुपयोग करत विजयी गोल करून अर्जेंटीनाचा पराभव करत जर्मनी चौथ्यांदा फुटबॉल वर्ल्ड चॅम्पियन ठरली.
डीबी टेक - नॉलेज पॅकेज (86 वर यासाठी)
जर्मनीच्या मारियो गोएत्जेने विश्व चॅम्पियन फाइनलमध्ये 88 व्या मिनिटाला हा गोल केला. मारोयो या खेळाडूला मिरोस्लाव क्लोजच्या जागी मैदानात उतवण्यात आले होते.
फॅक्ट फाइलः
ब्राझिलमध्ये झालेल्या फीफा वर्ल्डकप फुटबॉलच्या रोमांचक सामन्यामध्ये जर्मनीने अर्जेंटीनाचा 1 - 0 ने पराभव करत चौथ्यांदा विजयी किताब पटकवला. जर्मनीच्या मारियो गोएत्जेने मॅचच्या अतिरिक्त देण्यात आलेल्या मिनिटांमध्ये 23 व्या मिनिटाला हा विजयी गोल केला.
हा सामना इतका रोमहर्षक होता की, दोन्ही टीम निर्धारित 90 मिनिटे एकही गोल करू शकल्या नाही. मॅचच्या 30 व्या मिनिटानंतर सामना एक्स्ट्रा टाइममध्ये घोषित करण्यात आला.
याआधी जर्मनी 1954, 1974 आणि 1990 मध्ये विश्व चॅम्पियन झाला आहे. सर्वाधिक 5 वेळेस विश्व कप ब्राझिलने जिंकला आहे.
दक्षिण अमेरिकन देशात विश्वकप जिंकणारा जर्मनी हा पहिला यूरोपीय देश ठरला आहे. दक्षिण अमेरिकेच्या महाद्वीपमध्ये आयोजित करण्यात आलेल्या विश्वकपचे हे पाचवे वर्ष होते.
आश्चर्याची गोष्ट म्हणजे पहिल्यांदा गैर दक्षिण अमेरिकन देशाने बाजी मारली आहे.

यावेळी विजयी गोल करणा-या 22 वर्षीय मारियो गोएत्जेने म्हणाला, माझ्यासाठी हे अविश्वसनीय आहे. मला बोलण्यासाठी शब्द सुचत नाहीये. वर्ल्डकप जिंकणे आणि ते पण ब्राजीलमध्ये, हे एखादे स्वप्न साकार होण्यासारखे आहे.
गोएत्जेसाठी गेले 12 महीने अनेक कारणांमुळे संघर्षपूर्ण राहिले. स्वत:च्या बायर्न म्यूनिख या क्लबच्या सुरवातीच्या एकादश सामन्यासाठी तो स्थान मिळवू शकला नव्हता. वर्ल्डकपचा सर्वात मोठा व्यक्तिगत गोल्डन बॉल पुरस्कार स्विकारल्यानंतर अर्जेंटीनाचा कर्णधार मॅसी म्हणाला की, कोणताच पुरस्कार माझ्यासाठी औषधाचे काम करू शकणार नाही.