आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Kiss Of Love: Could Be A Clash With The Police In Kochi

83. आम्ही तर करणार \'किस ऑफ लव्ह\'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
2 नोव्हेंबर रोजी कोचीपासून सुरु झालेले 'किस ऑफ लव्ह'चे लोण आधी कोलकाता नंतर राजधानी दिल्लीपर्यंत पोहोचले.

डीबी टेक - नंबर 83 वर यामुळे
कारण, भारतामध्ये असे पहिल्यांदाच घडत आहे की कट्टरवादी संघटना आणि मॉरल पोलिसिंगचा (नैतिक पोलिसगिरी) विरोध सोशल नेटवर्कवर आणि खुलेआमपणे किस करून केला जात आहे.

फॅक्ट फाइल
- खरं तर 'किस ऑफ लव्ह' हे आंदोलन प्रेमी युगूलांना सार्वजनिकरित्या प्रेम व्यक्त केल्याबद्दल झालेल्या विरोधामुळे अनोख्या पद्धतीने करण्यात आले.

- ऑक्टोबर 2014 मध्ये मल्याळम वृत्तवाहिनी 'जय हिंद' ने मॉरल पोलिसिंगवर एक रिपोर्ट दाखवल्यानंतर हे प्रकरण तापले.

- केरळच्या चित्रपट निर्मात्याने मॉरल पोलिसिंगचा विरोध करत फेसबुकवर किस ऑफ लव्ह पेज बनवले आणि त्यानंतर हे एक आंदोलन बनले.

- 'किस ऑफ लव्ह' आंदोलन 2 नोव्हेंबरला कोचीच्या मरीन ड्राइव्हवर सुरु झाले आणि नंतर कोलकता, दिल्लीमधून भोपाळपर्यंत पोहोचले.

- कोची शहरातील सार्वजनिक ठिकाणी किस करणार्‍या युगुलांना अपमानित करून मारण्यात आले होते. याचाच परिणाम 'किस ऑफ लव्ह' आंदोलन आहे.

- हे आंदोलन सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून सुरु होऊन नंतर हैदराबाद युनिवर्सिटी, जेएनयू दिल्ली, पाँडिचेरी यूनिवर्सिटी, आयआयटी मद्रास आणि आयआयटी बॉम्बेपर्यंत पोहोचले.

- दिल्लीमध्ये संघ कार्यालयासमोर प्रदर्शन करण्यासाठी पोहोचलेले 'किस ऑफ लव्ह'चे समर्थक हिंदू सेनेच्या कार्यकर्त्यांशी भिडले.

- 'किस ऑफ लव्ह' कँपेनसाठी हेल्थ एक्स्पर्टने सांगितले की, अनोळखी व्याकीला किस करणे संक्रमणाचे कारण ठरू शकते.