आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

79. माइक्रोसॉफ्टने विकत घेतले नोकीयाला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमेरिकेची दिग्गज असलेली कंपनी मायक्रोसॉफ्टने 7.2 अब्ज डॉलरमध्ये जगातील सर्वात लोकप्रिय मोबाईल कंपनी असलेल्या नोकियाच्या सेलफोन व्यापाराला विकत घेतले आहे.
डीबी टेक - नॉलेज पॅकेज (79 वर यासाठी)
या व्यवहारामुळे नोकियाची ओळख बदलली आहे. भारतीय वंशाचे सीईओ राजीव सूरी यांनी पदाभार सांभाळल्यानंतर नोकियाची ओळख आता नेटवर्क उपकरण निर्माता कंपनी म्हणून राहिल.
•150 वर्षांच्या उत्कृष्ट कॉर्पोरेट इतिहास असलेल्या नोकिया कंपनीने त्यांचा व्यवसाय वुड पल्प आणि रबर बनवणाऱ्या कंपनीच्या रुपाने सुरूवात केली होती.
•वेळेनुसार पायाभूत सुविधा आणि मोबाईल बिझनेसमध्ये आपले वर्चस्व स्थापित केल्यानंतर नोकिया कॉर्पने 2014 मध्ये हँडसेट बिझनेस विकण्याचा निर्णय घेतला.
•या व्यवहारामुळे नोकियाला त्यांच्या हँडसेटची कमी होत असलेली विक्रीमुळे तोट्यातून बाहेर येण्यासाठी मदत मिळाली, तर मायक्रोसॉफ्टला मोबाईल मार्केटमध्येही आपले वर्चस्व स्थापित करण्याची संधी मिळाली.
•सध्या या मार्केटमध्ये सॅमसंग आणि अॅपलची धूम आहे. यासोबतच आता मायक्रोसॉफ्टने हार्डवेअर क्षेत्रातही अक्रामकपणे सुरूवात करण्यास तयारी केली आहे.
•नोकियाने नव्या पीढीच्या स्मार्टफोन तंत्रज्ञानाला समजून घेण्यास उशीर केली. आणि त्यांना जेव्हा या तंत्रज्ञानाची जाणीव झाली तो पर्यंत जगातील टॉप पाच कंपन्यांमधून नोकिया बाहेर गेली होती.
•सध्या स्मार्टफोनमार्केटमध्ये गूगलच्या अँड्रॉईड आणि अॅपलच्या आय-ऑपरेटिंग सिस्टमच्या फोनची 90 टक्के भागेदारी आहे.
•नोकियाच्या डिव्हाईस अँड सर्व्हीस व्यापाराला विकत घेण्याच्या व्यवहारांतर्गत मायक्रोसॉफ्टने या कंपनीच्या जवळपास 32,000 कर्मचाऱ्यांनाही आपल्यासोबत जोडले आहे.
•या व्यवहारासोबतच नोकियाचे प्रमुख (कॅनाडा) स्टीफन ईलॉप हे मायक्रोसॉफ्टमध्ये परततील. स्टीफन मायक्रोसॉफ्टच्या मोबाईल डिव्हाईसचे बिझनेस प्रमुख असतील. ईलाप यांना मायक्रोसॉफ्टमधून सेवानिवृत्त झालेले सीईओ स्टीव्ह बामर यांचा उत्तराधिकारी मानण्यात येते.