आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • PK Nude Posters, Fights Stir Up Controversy In Bollywood

68. 'पीके'चे पहिले पोस्टरमध्ये रेल्वे ट्रॅकवर न्यूड दिसला होता आमिर खान

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बहुचर्चित सिनेमा 'पीके' 19 डिसेंबरला रिलिज झाला. 'पीके'च्या पहिल्या पोस्टरमध्ये अभिनेता आमिर खान न्यूड दिसला. त्यामुळे मोठा वादही निर्माण झाला आणि मोठ्या कौशल्याने आमिर खानने तो हाताळला होता.
डीबी टेक - नॉलेज पॅकेज
मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानने 'पीके'मध्येही आपली स्टाइल 'आर्ट ऑफ सीक्रेसी' कायम ठेवल्याचे दिसून आले. आमिर नेहमी हटके करण्याचा प्रयत्न करतो आणि तो त्यात यशस्वीही होतो. 'पीके'ला हीट करण्यासाठी आमिर खान याने स्वत‍:च्या 'न्यूड पोस्टर'ची मार्केटिंग केली.

फॅक्ट फाइलः
*आम‍िर खानच्या मते, सीक्रेटिव्ह राहाणे खूप आवश्यक आहे. प्रेक्षकांना सिनेमा पाहाताना खरा आनंद मिळावा, ही त्याची यामागची भावना आहे.

*'पीके'च्या पहिल्या पोस्टरने प्रेक्षकांच्या मनातील उत्सुकता ताणून धरली होती.

*रेसलिंगमध्ये खेळाडू खुपच छोटे लंगोट परिधान करून मैदानात उतरतात. गुप्तांग झाकण्यासाठी मोठी कसरत करतात. मी तर गुप्तांग ट्रान्झिस्टरने झाकल्याचे आमिर खानने सांगितले होते.

*'पीके'च्या पोस्टरवरून मोठे वादंग निर्माण होईल, असे वाटले होते. मात्र, 'पीके'ला प्रेक्षक भरभरून प्रतिसाद देईल, असा विश्वासही दिग्दर्शक राजू यांनी आमिरमध्ये निर्माण केला होता.

*आमिर खानचा सिनेमा 'पीके'चे पहिले न्यूड पोस्टर आपण या आधीच पाहिल्याचा दावा बॉलिवूडचा किंगखान आणि अभिनेता शाहरूख खान याने केला होता. राजकुमार हिरानी यांनी ते रिलिज करण्‍यापूर्वी आपल्याला दाखवल्याचे शाहरुखने म्हटले आहे.
*'पीके'चे न्यूड पोस्टर रिलिज झाल्यानंतर 'न्यूडिटी' मागे मोठा अर्थ असल्याचे आमिर खान म्हणाला होता.