आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

51. पंतप्रधान मोदी यांचा पहिला अमेरिका दौरा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
25 ते 30 सप्‍टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेच्‍या दौ-यावर गेले. अगदी सेलिब्रेटीप्रमाणे त्‍याचे अमेरिकेत भव्‍य दिव्‍य स्‍वागत झाले.
डीबी टेक - नंबर 71 वर यासाठी:
पंतप्रधान मोदी अमेरिका दौ-यावर गेले असताना त्‍यावेळी नवरात्री उत्‍सव होता. मोदींनी पाच दिवस उपवास केले होते. या दौ-यामुळेच आगामी प्रजासत्‍ताक दिन संचलनासाठी मुख्‍य अतिथी म्‍हणून बराक ओबामा हजेरी लावणार आहेत.
फॅक्‍ट फाइलः
- अमेरिकेमध्‍ये प्रथमच एवढ्या मोठ्या जल्‍लोषात कुण्‍या एका नेत्‍याचे स्‍वागत झाले. उल्‍लेखनिय म्‍हणजे 9 वर्षांपूर्वी या नेत्‍याला अमेरिकेने व्हिसा नाकारला होता.

- मोदींनी आपल्‍या पाच दिवसीय दौ-यामध्‍ये अमेरिकेच्‍या संयुक्‍त महासभेत भाषण दिले.

- भारतात गुंतवणूक, उद्योग, सुरक्षा, दहशतवाद आदी मुद्यांना घेवून मोदींनी या दौ-यात चर्चा केली.

- हजारों किलोमीटरचा प्रवास करुन अमेरिकन नागरिक मोदींना ऐकण्‍यासाठी, पाहण्‍यासाठी लोक आले होते.

- न्यूयॉर्कच्‍या मेडिसन स्कवेअर गार्डनमध्‍ये मोदींनी भाषण दिले.

- अमेरिकेचे राष्‍ट्राध्‍यक्ष बराक ओबामा यांनी मोदींसोबत दोन दिवस चर्चा केली.

- पंतप्रधान मोदी आणि ओबामा यांनी अमेरिकेच्‍या वॉशिंगटन पोस्टसाठी संयुक्त संपादकीय लेख लिहिला.

- मोदी यांनी ओबामांना मार्टिन ल्‍यूथर किंग यांची 1959 ची भारतातील भाषणाची प्रत, गांधीजींनी सजविलेली गीतेची प्रत भेट दिली.