आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

61. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे लाल किल्ल्यावरुन भाषण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पंतप्रधान नरेद्र मोदी यांनी सरत्या वर्षात 68 व्या स्वातंत्र्यदिनी दिल्लीतील लाल किल्ल्यावरून देशाला संबोधीत केले. पंतप्रधान म्हणून लाल किल्ल्यावरुन त्यांचे हे पहिले भाषण होते.

डीबी टेक - नॉलेज पॅकेज (61 वर यासाठी)
एक तासाच्या या भाषणात पंतप्रधान मोदींनी ओघवत्या शैलीत आपल्या भावना व्यक्त केल्या. स्वतःला त्यांनी देशाचा प्रधानसेवक संबोधत, तुम्ही 12 तास काम करणार असाल तर मी 13 तास काम करेल असे आश्वासन दिले.

फॅक्ट फाइलः
- पंतप्रधान मोदींनी केशरी फेटा बांधून जवळपास 10 हजार लोकांना संबोधीत केले. लाल किल्ल्यावरुन त्यांचे हे पहिले भाषण होते.

- याआधी छत्तीसगड येथे प्रचारादरम्यान त्यांनी लाल किल्ल्याच्या प्रतिकृतीवरुन जनतेला संबोधित केले होते. याचाही खूप चर्चा झाली होती.

- पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कागद हातात न घेता भाषण केल्याचा दावा केला गेला. त्यासोबतच बुलेट प्रुफ बॉक्सशिवाय असलेल्या पोडियमवरुन त्यांनी भाषण केले.

- स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम बहुतेकवेळा फक्त व्हिआयपी आणि निमंत्रितांसाठीच राहात होता. यावेळी सर्वसामान्यांसाठीही खुर्च्या लावण्यात आल्या होत्या.

- एक तासाच्या भाषणात पंतप्रधान मोदींनी देशातील जनतेला स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या.

- पंतप्रधानांनी त्यांच्या भाषणात अनेक घोषणा केल्या. त्यात प्रमुख्याने योजना आयोगाची प्रासंगिकता संपली असून तो रद्द करण्याची. आदर्श ग्राम योजना आणि जन-धन योजना सुरु करण्याची घोषणा केली. यासोबतच स्वच्छता अभियान, सुरक्षा आणि धार्मिकतेवरही त्यांनी भाष्य केले.

- त्यांनी 'मेड इन इंडिया' या धर्तीवर 'कम मेक इन इंडिया' हा नारा दिला.

- कार्यक्रमाच्या शेवटी, मोदी कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या लहान मुलांना जाऊन भेटले. प्रोटोकॉल तोडत त्यांनी सर्वांची भेट घेतली.