आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Preity Zinta And Ness Wadia Controversy During IPL Match

90. प्रिती झिंटा - नेस वाडिया यांच्यात वाद

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रिती झिंटाने एक्स ब्वॉयफ्रेंड नेस वाडिया यांच्या विरोधात आयपीएल सामन्यादरम्यान छेडछाडीचा आरोप लावत एफआयआर दाखल केली.

डीबी टेक - नॉलेज पॅकेज (90 वर यासाठी)
हाय प्रोफाइल रील लाइफच्या बाहेरचे रीअल लाइफमधील वेगळे प्रकरण. आश्चर्याची गोष्ट हीच की, यांच्यातील भांडण देखील खुर्चीमुळे सुरू झाले आणि विषय तिसरीकडे वाढत गेला.
फॅक्ट फाइलः
30 मे रोजी मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये किंग्स इलेव्हन पंजाब आणि चेन्नई सुपरकिंग यांच्यात सामना सुरू होता.
नेस वाडिया त्यांची आई आणि भाच्यासोबत सामना पाहत होते. नेस स्टेडियममध्ये उशीरा पोहोचले होते. त्यामुळे त्यांना व्हिआयपी बॉक्समध्ये जागा मिळाली नाही. त्यांना सांगण्यात आले की, 10-15 मिनिटे वाट पाहा. त्यावेळी त्यांनी प्रितीला पहिल्या रांगेत मित्रांसोबत बसलेले पाहिले आणि ते प्रितीच्या जवळ गेले. तिला विचारले माझ्यासाठी रिझर्व ठेवण्यात आलेल्या खुर्चांचे काय झाले? यानंतर दोघांमध्ये कडाक्याचे शाब्दीक भांडण झाले आणि दोघे व्हिआयपी बॉक्समधून बाहेर कॉरपोरेट ऑफिसमध्ये निघून गेले. 12 जूनच्या रात्री प्रीति झिंटाने नेस वाडिया यांच्या विरोधात मरीन ड्राइव्ह पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला.
प्रितीने नेस वाडिया यांच्यावर छेडछाड करणे, शिव्या देणे आणि धमकावल्याचा आरोप लावला.
या सर्व प्रकरणामध्ये मरीन ड्राइव्ह पोलिसांनी आरोपीचे नाव समोर येवू नये यासाठी पुर्ण प्रयत्न केले. पण प्रकरण हाय प्रोफाइल असल्याने ते लपवणे पोलिसांच्या हातात नव्हते.

प्रितीच्या लिखित तक्रारीवर मरीन ड्राइव्ह पोलिस स्टेशनतर्फे नेस यांच्या विरोधात आयपीसी कलम 354 (महिलेवर हिंसात्मक हल्ला), 504 (शांतिभंग करण्यासाठी जाणून बूझून बेइज्जत करण्यासाठी उकसवणे), 506 (धमकी देणे) आणि 509 (शब्द, संकेत आणि व्यवहाराने महिलेच्या निजतेवर हल्ला ) या कलमांतर्गत गुन्हा नोंदवला.
दूसरीकडे, नेस वाडिया यांनी प्रितीने लावलेले आरोप नाकारले. या सर्व घटनेवर प्रतिक्रिया देण्याऐवजी हे प्रकरण तडजोड करून सोडण्यात आले.