आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Protesters Angered Death St. Louis Teen Rally Burning Flags

60. अमेरिकेत वर्णद्वेषातून झालेल्या युवकाच्या हत्येनंतर दंगली

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एका कृष्‍णवर्णीय युवकाच्या हत्येनंतर अमेरिकेच्या मिसूरी राज्यातील फर्ग्यूसनमध्‍ये सुरु झालेल्या दंगली 170 शहरांमध्‍ये पसरल्या. पूर्ण प्रकरणाने वेगळी कलाटणी घेऊन त्याला काळा-गोरा असा वर्णद्वेषाचा आकार देण्‍यात आला.

डीबी टेक - क्रमांक 60 वर का;
जगात दादागिरी करणा-या महासत्ता असलेल्या अमेरिकेच्या राष्‍ट्राध्‍यक्षपदी कृष्‍णवर्णीय बराक ओबामा आहेत.फर्ग्यूसन प्रकरणामुळे ओबामांची लोकप्रियतेचा आलेख खाली येईल असे म्हटले जाते.

फॅक्ट फाइल
अमेरिकेच्या सेंट लुई या उपनगरात 9 ऑगस्ट रोजी 18 वर्षीय कृष्‍णवर्णीय युवक मायकल ब्राऊनला पोलिस अधिका-याने दुकानातून सिगारेट पाकिट उचलण्‍याप्रकरणी केलेल्या कारवाईत त्याच्यावर गोळ्या झाडल्या. यात ब्राऊनचा जीव गेला.

घटनेच्या वेळी उपस्थित असलेल्या व्यक्तिने सांगितले , की पोलिस अधिकारी डॅरेन विल्सनने ब्राऊनला मारहाण केली. अधिका-याने विनाकारण त्याच्यावर गोळ्या झाडल्या व त्याची हत्या केली. हत्याप्रकरणी पोलिस अधिका-यावर गुन्हा दाखल करण्‍यास ग्रँड ज्यूरीने नाकार दिला.
ज्यूरीत नऊ गोरे आणि तीन कृष्‍णवर्णीय सदस्य होते. ज्यूरींच्या या निकालानंतर फर्ग्यूसन भागात दंगली सुरु झाल्या.गोळीबार आणि मोठ्याप्रमाणावर तोडफोडीच्या घटनांनी अमेरिकेच्या 170 शहरांमध्‍ये पसरले.

आंदोलकांनी लॉसअँजिल्स, ऑकलँड, अटलांटा, बोस्टन आणि शिकागोसह अनेक शहरांमध्‍ये फे-या काढण्‍यात आल्या होत्या.

न्यायालयाच्या निर्णयामुळे हे स्पष्‍ट होते की गोरे लोक कृष्णवर्णीयांवर कशा पध्‍दतीने अन्याय करत आहेत, असे आंदोलकांचे मत होते. अध्‍यक्ष ओबामांनी चर्चेचा प्रस्ताव मांडला पण तो त्यांनी फेटाळून लावला.