आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

63. धुमकेतूवर लँडिंग

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
युरोपियन स्पेस एजन्सीच्या रोबॉटिक अंतराळ यान 'रोझेटा' लँडर 'फिलाय'ला धूमकेतूवर उतरण्यास यश मिळाले. धुमकेतूवर यान उतरवण्याची ही पहिलीच वेळ होती.

डीबी टेक - नॉलेज पॅकेज (63 वर यासाठी)
हे लँडींग पृथ्वीपासून जवळपास 30 कोटी मैल म्हणजेच 48 कोटी किलोमिटर एवढ्या दूर झाले. पृथ्वीवरुन पाठवलेल्या एखाद्या यानाचे धुमकेतूवर लँडिंग होणे ही फार महत्त्वाची घटना मानली गेली. कारण त्यामागे 10 वर्षांची कठोर मेहनत होती.

फॅक्ट फाइलः
- अंतराळ विज्ञानातील ही ऐतिहासिक घटना होती. कारण पृथ्वीवरील एखादे यान अंतरिक्षातील बर्फाळ आणि धुलीकणांनी भरलेल्या धुमकेतूवर उतरण्यात यशस्वी झाले.

- 67P/Churyumov–Gerasimenko नामक या धुमकेतूचा शोध 1969 मध्ये युक्रेनच्या अंतराळ संशोधकाने लावला होता. त्यांचेच नाव या धुमकेतूला देण्यात आले होते.

- प्रारंभीक माहितीनुसार, धुमकेतूची पृष्ठभूमी बर्फाळ आहे आणि त्यांची लांबी दोन किलोमीटर आहे.

- रोझेटा मिशनला पूर्ण करण्यासाठी आतापर्यंत 10 हजार 700 कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे. एवढा विशाल खर्च करुनही या यशाच्या मानाने हा खुप कमी असल्याचे तज्ज्ञ मानतात.

- या अभियानाची सुरुवात 1980 च्या दशकात केली गेली होती आणि हे यान दहा वर्षांपूर्वी प्रक्षेपित केले गेले होते.

- 2 मार्च 2004 मध्ये सुरु झालेल्या या मिशनने 6.4 बिलियन किलोमीटर अंतर कापत धुमकेतूवर लँडिंग केले आहे.

- युरोपियन स्पेस सेंटरच्या माहितीनुसार, धुमकेतूवर असलेल्या जवळपास 4 अब्ज वर्षांपूर्वीच्या भौतीक माहितीवरून काही महत्त्वाचे तथ्ये सापडू शकतात.

- धूमकेतूची हे आपली सोलार यंत्रणा ज्या पदार्थाने बनली आहे त्याच पदार्थाने बनलेले असतात. यामुळे त्याचा अभ्यास करून पृथ्वीच्या उत्पत्तीबद्दल जास्तीत जास्त माहिती मिळवता येऊ शकते.

- धुमकेतूवर उतरल्यानंतर 'फिलाय'ने फोटो पाठवण्यास सुरूवात केली आहे. रोझेटा यान पुढील वर्षापर्यंत त्यावर राहाणार आहे.

- लँडींगनंतर बराच वेळ रोसेटा मिशनच्या तज्ज्ञांमध्ये अस्वस्थता होती. याचे कारण म्हणजे लँडींगनंतर या यानाशी संपर्क साधण्यात शास्त्रज्ज्ञांना 28 मिनटांचा वेळ लागला. मात्र लँडींगची जशी माहिती मिळाली, त्याक्षणी शास्त्रज्ञांनी आनंद व्यक्त केला.