आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

96. Samsung Galaxy Note Edge शानदार \'फोल्डेड स्क्रीन\' स्मार्टफोन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोरियन कंपनी 'Samsung' ने आपला बहुप्रतिक्षित स्मार्टफोन Galaxy Note Edge लॉन्च केला आहे. या फोनची उजव्या बाजुची स्क्रीन फोल्ड केलेली आहे. फोल्ड केलेला भाग हा नोटिफिकेशनसाठी देण्यात आला आहे. त्यामुळे युजर्सला उजव्या बाजुला अॅप्स, अलर्ट्स आणि अन्य आयकॉन्स दिसतात.
डीबी टेक - नॉलेज पॅकेज (96 वर यासाठी)
शानदार लुक असलेला Samsung Galaxy Note Edge हा फोन हाताळण्यास अगदी सोपा आहे. या फोनचे वैशिष्ट्य म्हणजे फोनवर कव्हर असल्यानंतरही युजर्सला आयकॉन्स सहज दिसतात.
फॅक्ट फाईल:
-Samsung ने बर्लिनमधील प्रसिद्ध 'टेक शो 2014'मध्ये हा फोन पहिल्यांदा सादर केला होता.
-Samsung Galaxy Note age हा फोन एक लिमिटेड एडिशन फोन आहे. जगातील विकसित देशांमध्ये यापूर्वीच हा फोन लॉन्च करण्यात आला आहे. भारतीय बाजारातर्फे Samsungला मोठी अपेक्षा आहे. नव्या वर्षात Samsung ला भारतीय बाजारातून खूप अपेक्षा आहे.
Samsung Galaxy note Edge मधील फीचर्स...
- 5.6 इंचाचा स्क्रीन आणि 1440X2560 पिक्सल रिझोल्युशन

-हाय डेफिनिशन रिझोल्युशन तसेच एमोलेड डिस्प्ले उजव्या बाजुने 160 डिग्री फोल्डेड

- ओक्टा कोर एग्जिनॉस प्रोसेसर

- अँड्रॉयड 4.4 किटकॅट ऑपरेटींग सिस्टम

- 174 ग्रॅम वजन

- बॅटरीः 3000 एमएएच

-किमत: जवळपास 62,300 रुपये

-3 GB रॅम, 32 GB इंटरनल स्टोरेज, 64 GB मायक्रो स्लॉट

-रिअर कॅमेरा: 16 एमपी रिअर विथ एलईडी फ्लॅश, ओआयएस आणि अल्ट्रा एचडी व्हिडिओ रेकॉर्डिंग

- फ्रंट कॅमेरा 3.7 एमपी, एफ 1.9 अपर्चर, 120 डिग्री व्हाइड अँगल लेंस

- अन्य फीचरः एस हेल्थ 3.5, फिंगर स्कॅनर, यूव्ही, हार्ट मोनिटरिंग, 4g एलटीई, वाय-फाय, ब्लूटूथ व्ही4.1 जीपीएस