आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

93. बंगळुरु येथील शाळेतील बालिकांवर लैंगिक अत्याचार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जुलैपासून नोव्हेंबरपर्यंत बंगळुरु येथील शाळेतील बालिकांवर लैंगिक अत्याचाराच्या तब्बल पाच घटना उघडकीस आल्या.
डीबी टेक- नॉलेज पॅकेज (93 वर यासाठी)
कारण- बंगळुरु एक सेफ शहर म्हणून ओळखले जात असे. पण आता या शहरातील सुरक्षेवर प्रश्नचिन्ह लागले आहे. आयटी शहर जेथे तरुणी रात्रभर काम करतात तेथे दिवसाढवळ्या शाळेतील बालिकांवर लैंगिक अत्याचार झाले.
फॅक्ट फाईल
- येथील खासगी शाळेच्या कॅम्पसमध्ये तीन वर्षीय बालिकेवर दोन वेळा लैंगिक अत्याचार करण्यात आला.

- नोव्हेंबरमध्ये घडलेल्या या घटनेनंतर पीडित बालिकेच्या आईने पोलिस तक्रार दाखल केली होती. त्यानंतर आरोपीला अटक झाली.

- ऑगस्ट महिन्यात झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणी पोलिसांवर दबाव वाढवण्यासाठी पालकांना आंदोलन करावे लागले होते. त्यानंतर दोन जीम इंस्ट्रक्टरर्सला अटक झाली होती.
- विशेष म्हणजे शाळेच्या प्रशासनाने पीडित बालिकेच्या पालकांना एक फॉर्म पाठविला. यात लिहिले होते, की आम्ही या घटनेसाठी जबाबदार नाही.

- पोलिसांनी दिलेली मार्गदर्शक तत्त्वांचे पालन न केल्याने सुमारे 200 शाळांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले.

- कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारमय्या यांची भूमिका यावर वादग्रस्त राहिली. ते म्हणाले होते, की आमच्याकडे ही एकच बातमी आहे का दाखवण्यासाठी?

- मुख्यमंत्री असेही म्हणाले होते, की ज्या क्लासरुममध्ये मुली असतात तेथून मुलांना दुर ठेवले पाहिजे.