आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

57. वादग्रस्‍त स्मृती - डिग्री, ज्योतिष, संस्कृत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मनुष्‍यबळ विकास मंत्री स्मृती ईरानी यांचा कार्यकाळ चांगलाच वादग्रस्‍त ठरत आहे. डिग्री, ज्‍योतिष, आणि संस्‍कृतचे अनिवार्य अध्‍ययन व्‍हावे या मुद्दांमुळे त्‍या कायम चर्चेत राहिल्‍या आहेत.

डीबी टेक - नंबर 57 वर यासाठी:
टीव्‍ही पडद्यावर गाजलेल्‍या स्‍मृती इराणी मोदींच्‍या केंद्रीय मंत्रीमंडळात राहून कायम वादग्रस्‍त ठरल्‍या आहेत.

फॅक्‍ट फाइलः
- 23 मार्च 1976 रोजी दिल्‍लीमध्‍ये स्‍मृती इराणींचा जन्‍म झाला. स्‍मृती परंपरावादी पंजाबी-बंगाली परिवारामध्‍ये जन्‍मली असूनसुध्‍दा ग्‍लॅमरजगतामध्‍ये पाय ठेवला.

- 10 पास होताच त्‍यांनी मॉडेलिंग क्षेत्रात पाय रोवले.

- टीव्‍ही मालिकेमध्‍ये त्‍यांनी यशस्‍वीरित्‍या काम केले. एकेकाळी स्‍मृती मोदींच्‍या कट्टर विरोधक होत्‍या. परंतु काही अवधीनंतर त्‍या मोदींच्‍या कट्टर समर्थक बनल्‍या.

- शपथपत्रात पदवीधर असल्‍याचे नमुद करत आणि आपल्‍याकडे वेगळ्याच विद्यापीठाची पदवी असल्‍याचे भाष्‍य करत त्‍यांनी वाद उत्‍पन्‍न केला होता.

- मानव संसाधन मंत्रालयाचे त्‍यांच्‍याकडे काम सोपविल्‍यानंतर विरोधकांनी मोठ्याप्रमाणावर विरोध केला होता.

- डिग्री प्रकरणी स्‍मृती म्‍हणाल्‍या होत्‍या की, माझ्या डिग्रीवर न जाता माझे काम बघा.

- स्‍मृती इराणी यांनी ज्‍योतिषाकडे हात दाखविल्‍यानंतर अशी मंत्री देशाचे काय करेल असा आरोप त्‍यांच्‍याविरुध्‍द विरोधकांनी केला होता.

-त्‍याविरोधात स्‍मृती म्‍हणाल्‍या होत्‍या की, ते माझे खासगी आयुष्‍य आहे. त्‍यामुळे त्‍याविषयी माध्‍यमांना जबाब देण्‍यास मी बांधील नाही.

- स्‍मृती राजस्थानच्‍या भीलवाड़ा मधील कारोई कस्बेच्‍या पं. नाथूलाल व्यासला खूप मानतात. त्‍यांनी स्‍मृतीच्‍या हातावरील रेषा पाहून त्‍यांना भविष्‍यात राष्‍ट्रपती बनण्‍याचा योग असल्‍याचे भाकित केले होते.