आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

74. सेलेब्रिटी कपल ऋतिक रोशन-सुझान यांचा घटस्फोट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सेलेब्रिटी कपल ऋतिक रोशन आणि सुझानने 1 नोव्हेंबरला मुंबईच्या वांद्रे कोर्टात घटस्फोट घेतला.

डीबी टेक - नॉलेज पॅकेज (74 वर यासाठी)
ऋतिक रोशन आणि सुझानचे 17 वर्षांचे नाते तुटणे दुःखदायी ठरले. त्यातल्या त्यात चांगली बाब म्हणजे घटस्फोटानंतरही सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये मुलांसाठी ते एकत्र आले.

फॅक्ट फाइल
- ऋतिक आणि सुझान 17 वर्षांपूर्वी भेटले होते. ऋतिकने मुंबईमध्ये एका सिग्नलवर सुझानला पाहिले होते आणि त्याचवेळी ती त्याला भावली होती.

- नंतर ऋतिकने सुझानला शोधले आणि व्हॅलेन्टाईन डेच्या दिवशी तिला अगदी फिल्मी स्टाइलने प्रपोज केले. तेव्हा सुझानने त्याचे प्रपोजल मान्य केले होते.

- सुमारे चार वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर 20 डिसेंबर, 2000 रोजी ऋतिक आणि सुझान विवाहबद्ध झाले.

- ऋतिकने गेल्यावर्षी डिसेंबरमध्ये एक प्रेस नोटद्वारे तो आता सुझानबरोबर नसून लवकरच घटस्फोट होणार असल्याचे स्पष्ट केले होते.

- त्यानंतर त्या दोघांचा समेट घडवण्याचा प्रयत्नही त्यांच्या कुटुंबीयांनी केला होता. पण त्याचा काहीही परिणाम झाला नाही. दोघांनी सहमतीने घटस्फोटासाठी अर्ज केला आणि वेगळे राहू लागले.

- दरम्यान सुझान पोटगी म्हणून ऋतिककडे 100 कोटींची मागणी करणार असल्याच्या बातम्या आल्या पण सुझानने त्या सर्व बातम्यांचे खंडन केले.

- ऋतिकचे वकील दीपेश मेहता म्हणाले की, सर्व काही दोघांच्या सहमतीने आणि व्यवस्थित झाले. तसेच घटस्फोटात कोणताही आर्थिक व्यवहार झाला नाही.

- ऋतिक आणि सुझान यांची दोन मुले आहेत. रिहान आणि रिदान. मुलांचा जॉइंट कस्टडी दोघांना मिळणार आहे. मुलांना आनंद मिळावा म्हणून सर्व प्रयत्न करणार असल्याचे दोघांनी स्पष्ट केले आहे.