आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Love Jihad Issue Tara Shahdeo Case Rakibul Admits Running Sex Racket

67. झारखंडची राजधानी रांचीमधील तारा- रकीबुल ‘लव्ह जिहाद’ प्रकरण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
झारखंडची राष्ट्रीय शूटर तारा शाहदेव हिने स्वत: पतीवर जबरदस्तीने धर्मांतर करण्याचा आरोप लावला होता. ताराच्या मते, तिच्या मुस्लिम पतीने स्वत:ला हिंदू सांगून तिच्याशी विवाह केला होता. त्यानंतर पतीचे पितळ उघडे पडल्यानंतर तो तिच्यावर अत्याचारही करू लागला होता.

डीबी टेक - नॉलेज पॅकेज
रांचीतील बहुचर्चित तारा शाहदेव प्रकरणाला ‘लव्ह जिहाद‘चा रंग चढवण्यात आला होता. वास्तवात राष्ट्रीय शूटर तारा शाहदेव हिने रकीबुलशी तिच्या मर्जीने विवाह केला होता. दोघांचा हा वैयक्तीक प्रश्न होता. मात्र, हे प्रकरण चव्हाट्यावर आल्यानंतर यातून अनेक खळबळजनक खुलासे उघडकीस आले.

फॅक्ट फाइलः
*तारा शाहदेव आणि रंजीत कुमार कोहली (रकीबुल) याची भेट रांचीमधील होटवारमध्ये शूटिंग प्रक्टिसदरम्यान झाली. दोघांमध्ये प्रेम फुलले आणि दोघांनी विवाह करण्याचा निर्णय घेतला.

*15 जून 2014 रोजी रंजीत कुमार कोहली याने मि‍त्र मुश्ताक अहमद याच्या घरी जेवणासाठी आलेल्या ताराच्या हातात साखरपुड्याच्या बांगड्या आणि अंगठी परिधान केली. नंतर 20 जूनला मुश्ताकच्या उपस्थितीत दोघांचा साखरपुडा झाला आणि सात जुलैला विवाह झाला.

*ताराने दिलेल्या माहितीनुसार, मेंदीचा कार्यक्रम हॉटेल ऑर्किड आणि विवाह समारंभ रेडिसन ब्लूमध्ये झाला. विवाहानंतर रंजीत आणि तारा रांचीमधील महावीर टॉवरमागील ब्लेअर अपार्टमेंटचा फ्लॅट क्रमांक आर-05मध्ये राहत होता.

*ताराने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, रंजीत कुमार अर्थात रकीबुल याने स्वत:ला हिंदू असल्याचे सांगून विश्वासघात केला. विवाहानंतर मुस्लिम धर्म स्विकारण्यास जबरदस्ती केली.
ताराने धर्मांतरास विरोध केल्यानंतर रकीबुल याने तिला मारहाण केली होती. एवढेच नाही तर तिने अनेक दिवस उपाशीही ठेवले.

*ताराच्या मते रंजीत कुमार उर्फ रकीबुल हसन हा रात्री घरी येत नव्हता. पहाटे चार वाजता घरी यात होता. रंजीत लोकांची कोर्ट-कचेरीची कामे करून देत होता. त्यांची अनेक न्यायाधिश, राजकीय नेते आणि बड्या अधिकार्‍याशी ओळख होती.

*रकीबुल हसन याला दिल्लीतील एका हॉटेलमधून झारखंड आणि दिल्ली पोलिसांच्या संयुक्त पथकाने 26 ऑगस्टला अटक केले. रकीबुल सोबत त्याची आई कौसर परवीन यादेखील हॉटेलमध्ये थांबल्या होत्या.