आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • The G 20 Summit In Russia\'s President Putin Of Walk out

78. जी-20 समिटमध्ये रशियाचे राष्ट्रपती पुतीनचा वॉकआऊट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ब्रिसबेनमध्ये जी-20 शिखर संमेलनात युक्रेन वादावर नाराज होऊन रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन हे संमेलन अर्ध्यामध्येच सोडून रशियात परतले.
डीबी टेक - नॉलेज पॅकेज (78 वर यासाठी)
जी-20 शिखर संमेलन अर्ध्यात सोडण्यामागे युक्रेन वाद हेच कारण होते असे सर्वांनाच वाटते, तर पुतीन यांनी झोप पुर्ण न झाल्याने मला थकवा आला होता. त्यामुळे मी मॉस्कोत परतलो असे सांगितले.
• रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांनी संमेलनाच्या दुसऱ्याच दिवशी वॉकआऊट केले. ते हिल्टन हॉटेलवरून विमानतळाच्या दिशेने चुपचाप निघून गेले.
• पुतिन जी-20 शिखर संमेलनामध्ये आलेल्या नेत्यांवर नाराज होते. कारण जवळपास सर्वच देशांच्या नेत्यांनी युक्रेनमध्ये रशियाच्या हस्तक्षेपावर टीका केली होती.
• राष्ट्रपती पुतिन यांनी हा निर्णय घेण्याआगोदर शनिवारी अनेक घटना घडल्या. पश्चिमेकडील देशांनी युक्रेनवरील संकटात रशियाच्या भूमिकेवर ताशेरे ओढले.
• पुतिन जेव्हा कॅनडाचे पंतप्रधान स्टीफ हॉपर्स यांना भेटून हात मिळवण्यासाठी पुढे केला, तेव्हा हार्पर म्हणाले की, मी तुमच्याशी हात मिळवेल, मात्र मला तुम्हाला केवळ एकच सांगायचे आहे - ते म्हणजे तुम्हाला युक्रेनच्या बाहेर निघून जायला हवे.
• अमेरिकेचे राष्ट्रपती बराक ओबामाही म्हणाले की, युक्रेमध्ये रशियाची अक्रामकता जगासाठी धोका आहे.
• ब्रिटनने धमकी दिली आपल्या शेजारील देशाला अस्थिर बनवणे बंद नाही केले तर त्यावर नवे प्रतिबंध लावण्यात येईल अशी ब्रिटनने धमकी दिली.
• राष्ट्रपती पुतिन यांच्या वॉक आऊटनंतर जगाची अर्थव्यवस्था आणि इबोला संक्रमण असा निर्णयांवर आणि जी-20 च्या यशस्वीतेवर शंका उत्पन्न होत होती.