आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • The Launch Of Master Blaster Sachin Tendulkar\'s Autobiography In Mumbai

82 सचिनची ऑटोबायोग्राफी: थोडे रहस्य आणि अनेक वाद

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नोव्हेंबरमध्ये प्रकाशित झालेल्या सचिन तेंडुलकरच्या अधिकृत आत्‍मचरित्र ‘प्लेइंग इट माय वे‘ पुस्तकाने बाजारात विक्रमाचा नवीन रेकॉर्ड करण्यासोबतच अनेक रहस्य उघड केले.

डीबी टेक - नंबर 82 वर यामुळे...
कारण, शांत स्वभावाच्या सचिनने आपल्या आत्‍मचरित्रामध्ये ग्रेग चॅपल आणि कपिल देव यांच्या विरोधात भाष्य केले आहे.

फॅक्ट फाइल :
- ‘प्लेइंग इट माय वे‘च्या माध्यमातून मास्टर ब्लास्टरने दावा केला आहे की, मी स्वतःच्या जीवनातील सत्य लोकांसमोर मांडत आहे.

- सचिनने हेही सांगितले की, या पुस्तकाच्या माध्यमातून कोणताही वाद निर्माण करण्याचा माझा हेतू नव्हता, परंतु चॅपलच्या विरोधातील भाष्यामुळे हे पुस्तक चर्चेत आले.

- या पुस्तकाचे प्रकाशक हॅचेट यांनी सांगितले की, या पुस्तकाने विक्रीचा नवीन विक्रम प्रस्थापित केला आहे.

- या पुस्तकाची विक्री सुरु होण्यापूर्वी (6 नोव्हेंबर, सकाळी 11 वाजून 30 मिनिटांपर्यंत) एकूण दीड लाख प्रतींची बुकिंग झाली होती.

- अशाप्रकारे या पुस्तकाने नामाकिंत हार्डबॅक डॅन ब्राउनच्या ‘इनफर्नो', वॉल्टर इसाकसनच्या ‘स्टीव्ह जॉब्स‘ आणि जेके राउलिंगच्या ‘कॅज्युअल वॅकन्सी‘च्या प्री ऑर्डर विक्रीचे विक्रम मोडीत काढले आहेत.

- 2006 मध्ये जॉन राईट यांच्या ‘इंडियन समर्स‘ पुस्तकाच्या माध्यमातून पहिल्यांदा भारतीय ड्रेसिंग रूममधील रहस्य उघड झाले होते.

- रिकी पॉटिंगने त्याचे आत्मचरित्र ‘पॉटिंग− अ‍ॅट द क्लोज ऑफ प्ले'मध्ये हरभजन आणि सायमंड यांच्या वादामध्ये बीसीसीआय आणि भारतीय टीमवर टीका केली होती.

- शोएब अख्तरने त्याच्या आत्मचरित्राच्या माध्यमातून राहुल द्रविड आणि सचिन तेंडूलकर या खेळाडूंच्या खेळावर प्रश्न उपस्थित करून सर्वांना चकित केले होते.

- ऑस्ट्रेलियाचा खेळाडू अ‍ॅडम गिलक्रिस्टने त्याचे आत्मचरित्र ‘ट्रू कलर्स’मध्ये लिहिले होते की, सचिन तेंडुलकरमध्ये खेळाडू वृत्तीची कमतरता आहे.