आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

95. जिवघेण्या इबोलाची लस तयार करण्यात संशोधकांना यश

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आंतरराष्ट्रीय व्हायरस घोषित झालेल्या इबोलाची लस तयार करण्यात संशोधकांना यश आले आहे. नवीन वर्षांत सर्वसामान्य नागरिकांसाठी ही लस बाजारपेठेत येणार आहे.
डीबी टेक- नॉलेज पॅकेज (95 वर यासाठी)
कारण- इबोला असा व्हायरस आहे ज्यावर काही औषधे किंवा उपचार नाही. यामुळे लसीच्या माध्यमातून या आजारावर प्रतिबंध घालता येऊ शकतो.
फॅक्ट फाईल
- आफ्रिकेतील देश लायबेरिया, सिएरा लियोन, नायजेरीया आणि गिनीत इबोला व्हायरचा गंभीर परिणाम दिसून आले.

- जागतीक आरोग्य संघटनेचे साहायक महासंचालक मॅरी पॉल गिनी यांनी सांगितले, की पुढील वर्षाच्या सुरवातीला लाखो लसी उपलब्ध होणार आहेत.

- पश्चिम आफ्रिकेतील आरोग्य अधिकारी आणि इतर कर्मचाऱ्यांना डिसेंबर महिन्यात लसी देण्यात आल्या.

- सीएडी3-झेडईपीओवी आणि आरव्हीएसव्ही-झेडईपीओव्ही अशा दोन लसी तयार करण्यात आल्या आहेत. अमेरिका आणि ब्रिटनमध्ये झालेल्या चाचण्यांत त्या यशस्वी ठरल्या आहेत.

- याशिवाय झेडमॅप या औषधीवर संशोधन सुरू आहे. अमेरिकेत यावर प्रयोग सुरु आहेत. इबोला आजारावर हे प्रभावी औषध असेल.

- स्वित्झर्लंड, जर्मनी, केनिया, गॅबॉन आदी देशातही लसींवर संशोधन सुरु आहे. इतर पाच लसिंवर काम सुरु असून फेब्रुवारी 2015 पर्यंत सामान्यांसाठी त्या बाजारपेठेत आणल्या जाणार आहेत.

- लसी तयार करणाऱ्या कंपन्यांनी त्याचे उत्पादन वाढविणार असल्याचे सांगितले आहे. पुढील वर्षी मोठ्या संख्येने याच्या लसी मिळणार आहेत.