आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

80. विराट कोहली म्हणाला, हो माझे अनुष्कावर प्रेम आहे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारतीय क्रिकेट टीमचा स्टार क्रिकेटर विराट कोहलीने अभिनेत्री अनुष्का शर्मासोबत सुरू असलेल्या अफेयरबद्दल पहिल्यांदा उघडपणे वक्तव्य केले आहे. तो म्हणाला "जे आहे ते सर्वांच्या समोर आहे".
डीबी टेक - नॉलेज पॅकेज (80 वर यासाठी)
क्रिकेट आणि बॉलीवुडचे संबंध फार जुने आहेत. ही नवी जोडी यासाठी विशेष आहे कारण दोघेही यशस्वी आहेत, नातेसंबंधांबाबद खुपच स्पष्ट आहेत आणि त्याचा परिणाम काहीही असो त्याचा सन्मान करणारे आहेत.
फॅक्ट फाइलः
•विराट कोहली आणि अनुष्का शर्मा बऱ्याच महिन्यांपासून एकमेकांना डेट करतात.
•भारतीय टीमच्या विदेशी दौऱ्यांवर विराट आणि अनुष्का यांना एकत्र पाहाण्यात आले आहे.
•मुंबईमध्ये पहिल्यांदा विराटने स्पष्ट केले की, ‘जे काही आहे ते सर्वांच्या समोर आहे. आम्ही कोणतीही गोष्ट लपवलेली नाही आणि आम्ही तसा प्रयत्नही करत नाही. मला काहीच लपवायला आवडत नाही‘
•कोहली म्हणाला, ‘जर तुम्ही एकमेकांसोबत वारंवार दिसत असाल आणि तरीसुध्दा तुम्ही (आमच्या नात्याबद्दल) विचारत असाल, तर मला वाटते ही फार सामान्य गोष्ट आहे, आणि जर तुम्हाला माहिती आहे तर मग पुन्हा असले प्रश्न विचारून काय फायदा?‘
•विराट म्हणाला, ‘यापाठी मागे एक तर्क आहे. आम्हाला काहीच लपवण्याची इच्छा नाही. हा आमच्या दोघांसाठी खासगी प्रश्न आहे, त्यामुळे आम्ही याविषयी काहीच बोलू इच्छित नाही. आमच्या भावनांचा मेडिया आणि इतर सर्वांनीच सन्मान करायला हवा.‘
•तर तिकडे अनुष्का शर्मानेसुध्दा सांगितले की, आमच्यातील नाते कोणापासून लपलेले नाही, मात्र मी याबद्दल काहीही सार्वजनिकपणे बोलणार नाही.
•अनुष्का म्हणाली, ‘तुम्ही याला मनोरंजनाची बातमी बनवू शकत नाही. मी माझ्या खासगी आयुष्याबद्दल केवळ माझ्या मित्रमैत्रिणींनाच सांगेल , पुर्ण जगाला नाही.‘
•विराटला जेव्हा विचारण्यात आले की, तु चित्रपटांमध्ये काम करशील का? तेव्हा तो म्हणाला की, ‘तुम्ही मला कधीच बॉलिवूडच्या चित्रपटांमध्ये पाहाणार नाही.‘