आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

87. विराट कोहलीने बनवल्या सर्वात जलद 6000 धावा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारतीय संघाचा धडाकेबाज फलंदाज विराट कोहली एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वात जलद 6,000 धावा बनवणारा फलंदाज ठरला आहे. कोहलीने विवियन रिचर्ड्स यांचा रेकॉर्ड मोडून काढत 136 व्या सामन्यांमध्ये याची नोंद केली आहे.
डीबी टेक - नॉलेज पॅकेज (87 वर यासाठी)
विराट कोहलीसाठी हा विक्रम यासाठी महत्त्वाचा आहे कारण की, 2014 मध्ये त्याच्या खराब फॉर्म आणि अनुष्का शर्माच्या बातम्यांमुळे तो चर्चेत आला होता. या प्रश्नांवर त्याने फलंदाजीच्या माध्यमातून उत्तर दिले.
फॅक्ट फाइलः
विराटने श्रीलंकेविरूद्ध खेळण्यात आलेल्या तिस-या एकदिवसीय सामन्यात 6 हजार धावा पूर्ण केल्या. यावेळी प्रेक्षकांमध्ये बसलेल्या अनुष्का शर्माकडे बॅटच्या सहाय्याने ‘किस‘ करत त्याने हा विक्रम साजरा केला.

कोहलीने वेस्ट इंडीजचा माजी दिग्गज खेळाडू विवियन रिचर्ड्स यांचा विक्रम तोडत 136 व्या सामन्यामध्ये या विक्रमाची नोंद केली. याआधी रिचर्ड्स यांनी 141 व्या सामन्यामध्ये 6000
धावांचा विक्रम नोंदवला होता.
धडाकेबाज 6 हजारी धावा बनवण्याचा विक्रम सौरभ गांगुलीच्या नावावर होता. त्याने 152 सामन्यांपैकी 147 सामन्यांमध्ये ही कामगिरी केली होती.

सर्वात जलद 6 हजार धावा बनवणारे 5 फलंदाज
- भारताचा विराट कोहली 136 वा सामना
- वेस्ट इंडीजचे विवियन रिचर्ड्स 141 वा सामना
- भारताचा सौरभ गांगुली 147 वा सामना
- साउथ अफ्रीकेचा एबी डिविलियर्स 147 वा सामना
- ऑस्ट्रेलियाचा मॅथ्यू हेडन 154 वा सामना