आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

54. 43 देशांतील प्रवाशांना भारतात व्हिसा ऑन अरायव्‍हल योजना

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारत सरकारने जपान, रशिया, ऑस्ट्रेलिया आणि यूएस सह 43 देशांतील पर्यटकांना विना व्हिसा प्रवेश दिला आहे.

डीबी टेक - नंबर 54 वर यासाठी:
हा एक मोदी प्रभावच आहे. भारतातील वातावरण ढवळून निघत आहे.

फॅक्‍ट फाइलः
- यूएस, ऑस्ट्रेलिया आदी देशातील दौ-यांवर मोदींनी ही घोषणा केली. या देशातील लोकांना व्हिसा ऑन अरायव्‍हल ही सुविधा उपलब्‍ध करुन दिली.

- व्हिसा ऑन अरायव्‍हल ही सुविधा देशातील नऊ विमानतळावर उपलब्‍ध होणार आहे. त्‍यामध्‍ये दिल्ली, मुंबई, चेन्नई, कोलकाता, हैदराबाद,बंगळूरु, तिरुवनंतपुरम, कोची आणि गोवा येथ्‍ो असणार आहे.

- प्रवाशांना फिरण्‍यासाठी, मित्र आणि परिवाराला भेटण्‍यासाठी, समारंभात सहभागी होण्‍यासाठी तीस दिवसांचा व्हिसा सुविधा दिल्‍या जाणार आहे.

- सध्‍या स्थितीत दक्षिण कोरिया, जपान, फिनलँड, सिंगापुर, न्यूजीलंड, इंडोनेशिया, म्‍यानमार, व्हियतनाम आणि लाओस या देशांना व्हिसा ऑन अरायव्‍हल सुविधा देण्‍यात आली आहे. एकूण 43 देशांना ही सुविधा सुरु करण्‍यात येणार आहे.

- विदेशी पर्यटक वेबसाइटवर व्हिसासाठी ऑनलाइन नोंदणी करु शकतात. ऑनलाईन फोटो आणि पासपोर्ट बनविण्‍यासाठी 72 तासांच्‍या आत फी भरावी लागते.