आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • WhatsApp Crosses 60 Million Monthly Active Users In India

85. व्हॉट्सअ‍ॅप बनले 60 कोटी लोकांची पसंत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मेसेजिंग अ‍ॅप व्हॉट्सअ‍ॅप प्रत्येक महिन्याला 25 मिलियन (लाख) नवीन युजर्स जोडत आहे. अ‍ॅक्टिव्ह युजर्सचा आकडा 600 मिलियनच्या पुढे आहे.

डीबी टेक - नंबर 85 वर यामुळे
60 कोटी अ‍ॅक्टिव्ह युजर्समध्ये सर्वात जास्त 70 मिलियन म्हणजे 7 कोटी युजर्स भारतात आहेत. फेसबुक-व्हॉट्सअ‍ॅप करारानंतर नवीन मालक मार्क झुकेरबर्गचे पूर्ण लक्ष भारताकडे आहे.

फॅक्ट फाइलः
- व्हॉट्सअ‍ॅप एक मेसेजिंग अ‍ॅप असून याच्या माध्यमातून सोशल नेट्वर्किंग आणि डाटा शेअरिंग करणे खूप सोपे झाले आहे.

- फेसबुकने 21.8 बिलियनमध्ये व्हॉट्सअ‍ॅप खरेदी केले. टेक वर्ल्डमध्ये आतापर्यंतची ही सर्वात मोठी डील होती. यानंतरच व्हॉट्सअ‍ॅपने प्रत्येक महिन्याला 25 लाख नवीन युजर्स जोडले आहेत.

- अधिकृतरीत्या ऑगस्टपर्यंत अ‍ॅक्टिव्ह युजर्सचा आकडा 500 मिलियनपर्यंत पोहोचला होता. परंतु भारत दौर्‍यावर आलेल्या झुकेरबर्ग यांनी 600 मिलियन युजर्स असल्याचा दावा केला.

- व्हॉट्सअ‍ॅप अ‍ॅक्टिव्ह युजर्सच्या बाबतीत भारताने 7 कोटी युजर्ससोबत ब्राझीलला मागे टाकले आहे. ब्राझीलमध्ये 4.5 कोटी युजर्स आहेत.

- इतर मेसेजिंग अ‍ॅपप्रमाणे व्हॉट्सअ‍ॅप सध्या जाहिरातीमधून पैसा कमावणार नाही. झुकेरबर्गने सांगिलते की, आमचा उद्देश उत्तम सर्विस देण्यावर आहे कारण प्रत्येक युजरला उत्तम दर्जाची सेवा हवी आहे.

- व्हॉट्सअ‍ॅप युजर्स दररोज 700 मिलियनपेक्षा जास्त फोटो आणि 100 मिलियन व्हिडिओ शेअर करतात.

- व्हॉट्सअ‍ॅपचे नवीन लक्ष्य एक अब्ज युजर्स जोडण्याचे असून यामध्ये भारताचे सर्वात मोठे योगदान राहील.