आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

75. पिंजर्‍यात उडी मारलेल्या युवकाची वाघाने केली शिकार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
23 सप्टेंबरला दिल्लीच्या प्राणीसंग्रहालयात पांढर्‍या वाघाच्या पिंजर्‍यात पडलेल्या युवकाची वाघाने शिकार केली. त्याचे विविध व्हिडीओ लगेचच व्हायरल झाले होते.

डीबी टेक - नॉलेज पॅकेज (75 वर यासाठी)
अत्यंत वेगळी अशी ही घ़टना होती. त्यात चूक, बेजबाबदारपणा किंवा उद्दामपणाची शिक्षा मिळाली होती. प्राणीसंग्रहालयांमध्ये प्राण्यांना त्रास देणार्‍यांसाठी ही घटना धडा शिकवणारी ठरेल.

फॅक्ट फाइल
- उद्दाम युवकाची ओळख दिल्लीतील मकसूद अशी झाली आहे. उपस्थितांनी दिलेल्या माहितीनुसार दुपारी एकच्या सुमारास हा वाघाच्या पिंजर्‍यात वाकून पाहत होता.

- या दरम्यान त्याचा पाय घसरला आणि तो वाघाच्या पिंजर्‍यात पडला. प्राणीसंग्रहालय प्रशासनाने मात्र या युवकाने बॅरीकेडवर चढून पिंजर्‍यात उडी घेतल्याचे सांगितले आहे.

- युवक पिंजर्‍यात सुमारे 10 मिनिटे वाघाबरोबर संघर्ष करत होता. पण कोणीही त्याच्या मदतीला धावून आले नाही.

- वाघापासून बचाव करण्यासाठी त्या युवकाने शक्य ते सर्व प्रयत्न केले. अखेरच्या क्षणी भीतीने त्याने वाघासमोर हातही जोडले पण वाघाने पंजाने त्याला जखमी केले आणि नंतर त्याची मान पकडली.

- वाघ युवकाला पिंजर्‍यात इकडून तिकडे ओढत राहिला. पिंजर्‍याच्या एका कोपर्‍यात नेऊन मान तोडल्यानंतर त्याने युवकाला सोडले.

- याच दरम्यान सुरक्षारक्षक त्याठिकाणी पोहोचले. त्यांनी काठ्यांनी ग्रिल वाजवण्यास सुरुवात केली. त्यामुळे वाघाने पुन्हा त्या युवकाची मान पकडली.

- तमाशा पाहणार्‍या लोकांनी व्हिडिओ तयार केले ते इंटरनेट - फेसबूक- व्हाट्सअ‍ॅपवर व्हायरल झाले.

- अशीच एक घटना ग्वाल्हेरमध्येही घडली पण येथे एका माथेफिरूने पिंजर्‍यात घुसून वाघाला पळवून लावले होते.

- काही दिवसांपूर्वी स्पेनच्या बार्सिलोना झूमध्येही एका जणाने सिंहांच्या पिंजर्‍यात उडी मारली होती. पण तीन सिहांनी त्याला खेळण्याची एखादी वस्तू समजून त्याच्याबरोबर खेळू लागले. त्यानंतर सुरक्षारक्षकांनी पाण्याचा मारा करत सिंहांना हटवले आणि त्या युवकाचे प्राण वाचवले.