आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Xiaomi Redmi Note Sale: Phablet Buyers Re sell It Online

81. भाग्यशाली व्यक्तीलाच मिळतो Xiaomi Phone

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
Flipkart वर फ्लॅट सेल स्वरूपातील ऑनलाTन विक्रीमध्ये चीनी मोबाईल मेकर कंपनीने काही सेकंदातच लाखो फोन विकले.


डीबी टेक - नंबर 81वर यामुळे...
कारण, Xiaomiमुळे भारतामध्ये ऑनलाईन स्मार्टफोन विक्रीचा नवीन ट्रेंड सुरु झाला. कमी किमतीत उत्तम दर्जाच्या स्मार्टफोनसाठी एवढी उत्कंठता यापूर्वी कधीही दिसली नाही.

फॅक्ट फाइल:
- 2010 मध्ये स्थापन झालेली Xiaomiचीनमधील सर्वात लोकप्रिय कंपनी आहे. याचा उच्चार ‘शॉउमी‘ नावानेही केला जातो.

- फक्त चार वर्षांत Xiaomi जगातील तिसरी सर्वात मोठी फोन कंपनी झाली आहे. नंबर एकवर सॅमसंग आणि दोनवर अ‍ॅपल आहे. अ‍ॅपलसारखा उच्च स्तराचा फोन बनवल्यामुळे याला 'चीनी अ‍ॅपल' असेही म्हटले जाते, परंतु या फोनची किंमत अ‍ॅपलच्या तुलनेत फार कमी आहे.

- भारतीय बाजारपेठेत विक्री करण्यासाठी Xiaomiने Flipkart कंपनीशी करार केला आहे.

- 29 जुलै रोजी जेव्हा Xiaomi कंपनीच्या 'एमआय-3' स्मार्टफोनची Flipkart वर बुकिंग सुरु झाली तेव्हा ही वेबसाईट क्रॅश झाली होती.

- Xiaomiने पहिल्यांदाच 22 जुलै रोजी 38 मिनिट आणि 50 सेकंदात 20000 फोन विकले.

- यानंतर Xiaomiच्या 15000 आणि 20000 फोनचा स्टॉक 5,2, आणि 4 सेकंदात पापणी लवताच विकला गेला.

- एका बातमीनुसार Flipkart वर विकत घेतलेला फोन काही लोक जास्त किमतीत ऑनलाइनवर विकत आहेत.

- या कंपनीने भारतात 'एमआय-3' फोनची किंमत 13,999 रुपये ठेवली आहे. 'एमआय-3'ची किंमत मोटोरोलाच्या 'मोटो-जी' आणि आसुसच्या 'झेनफोन-5'ला टक्कर देत आहे.

- Xiaomi रेडमी 1एस, रेडमी नोट यासारखे दुसरे मॉडल्स भारतीय बाजारात पाय रोवत आहेत.