Home | International | Other Country | A 100-year-old elderly lady stand for election

१०० वर्षांची वयोवृद्ध शिक्षिका उतरली निवडणूक रिंगणात, आयुष्याचा दुसरा डाव राजकारण प्रवेशातून सुरू

वृत्तसंस्था | Update - Apr 15, 2019, 09:32 AM IST

लोक विचारतात, १०० व्या वर्षांतही निरोगी राहण्याचे गुपित काय?

 • A 100-year-old elderly lady stand for election


  म्युनिच - भारतात सक्रिय राजकारणात राहण्याच्या वयावरून वादंग सुरू आहे. तेथे पंचाहत्तरी ओलांडलेल्या नेत्यांना सक्तीची निवृत्ती घेणे भाग पडत आहे. जर्मनीत नेमके उलट चित्र पाहायला मिळत आहे. येथील लिसल हेज या क्रीडा शिक्षिकेचे वय १०० वर्षे असून त्यांनी आपल्या आयुष्याचा दुसरा डाव राजकारण प्रवेशातून सुरू केला आहे. त्या किरचॅम्बोलेंडेन शहर परिषदेसाठी निवडणूक लढवत आहेत.


  युवांना सर्व सुविधा देता याव्यात यासाठी त्यांनी हा निर्णय घेतला आहे. त्यांनी आयुष्यभर यासाठी संघर्ष उभारला होता. भारतात २३ मे रोजी निवडणूक निकाल जाहीर होईल. मात्र, किरचॅम्बोलेंडेनमध्ये २६ मे रोजी मतदान होणार आहे. शहराबाहेर २०११ पासून बंद पडलेला जलतरण तलाव नव्याने करणार असल्याचे आश्वासन लिसल यांनी दिले. ८ हजार लोकसंख्येच्या किरचॅम्बोलेंडेनमध्ये लिसल यांच्या प्रस्तावाकडे दुर्लक्ष करण्यात आले. येथील युवांनी खेळासोबत प्रत्येक क्षेत्रात पुढे असावे, अशी त्यांची इच्छा आहे. याच कारणास्तव त्यांनी निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला. त्या म्हणाल्या, सार्वजनिक जीवनात क्रीडा शिक्षिका होऊन मी तरुण पिढीला बळकट केले. मात्र, आता देशाला बळकट करण्याची वेळ आली आहे. त्या सध्या दिवस उजाडताच तरुण/तरुणींसोबत निवडणूक मोहीम राबवतात. इथे त्यांच्यासाठी मोठा स्थानिक मुद्दा नाही. मात्र, ब्रेक्झिट व वातावरण बदलाच्या मुद्द्यावर युवांना एकत्र येण्याचा सल्ला त्या देतात. ब्रेक्झिटला एका मंचाचे रूप दिले जायला नको होते, असे त्यांचे म्हणणे आहे. महिलांच्या आरक्षणाच्या मुद्द्यावरूनही त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. जर्मन संसदेत महिलांचे प्रतिनिधित्व त्यांच्या लोकसंख्येच्या तुलनेत नाही. गेल्या १४ वर्षांत देशाचे नेतृत्व अँजेला मर्केल यांच्या रूपात एका महिला चान्सलरच्या हातातच होते, अशी विचारल्यावर त्या म्हणाल्या, देशातील प्रत्येक महिला प्रत्येक क्षेत्रात बळकट होईल तेव्हाच देशाला योग्य दिशा मिळेल.
  लिसल हेज


  लोक विचारतात, १०० व्या वर्षांतही निरोगी राहण्याचे गुपित काय?
  लिसल यांना निवडणूक प्रचारादरम्यान विविध प्रश्न विचारतात. त्यात एक प्रश्न समान असतो. तो म्हणजे, १०० व्या वर्षांतही तुम्ही निरोगी असण्याचे गुपित काय? त्यावर त्या प्रत्येकाला एकच उत्तर देतात. यासाठी तीन बाबी आवश्यक आहेत. १. खूप खेळा. २. पौष्टिक अन्न. ३. मेंदू कायम कार्यमग्न ठेवा. या सर्व बाबी लक्षात ठेवल्यास तुम्हीही १०० वर्षांपेक्षा जास्त जगू शकता.

Trending