आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पर्वतांवर भटकंती करणा-या इंजीनियरला मिळाला एक लाख वर्षांपुर्वीचा दगड, यामध्ये होता 3 पिनचा प्लग

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

न्यूयॉर्क. जगात वेगवेगळ्या वेळी लोकांनी अनेक दावे केले आहेत. ज्यांवर विश्वास ठेवणे थोडे कठीण असते. नॉर्थ अमेरिकेत राहणा-या एका इंजीनियरने काही वर्षांपुर्वी असाच एक दावा केला होता. त्याने सांगितले होते की, त्याला पहाडी भागात भटकंती करताना एका दगडामध्ये एक इलेक्ट्रिक कम्पोनेंट मिळाले होते. तो दगड जवळपास 1 लाख वर्षे जुना होता. भू-वैज्ञानिकांनी दगडावर संशोधन केले, तो दगड खरंच जुना होता. परंतू या कंपोनेंट डिव्हाइची सत्यता आजपर्यंत कुणालाही माहिती नाही. 


आजसारखेच डिव्हाइस मिळाले 
- 1 लाख वर्षे जुना स्टोन प्लग डिव्हाइस मिळाल्याचा दावा अमेरिकेतील इलेक्ट्रिक इंजीनियर जॉन जे. विलियम्सने 1998 मध्ये केला होता. इंजीनियरने सांगितले की, नॉर्थ अमेरिकाच्या एका पहाडी भागात भटकंती करताना त्याला हे डिव्हाइस मिळाले होते. त्याच्यानुसार, हे जमीनीत होते, त्याने हे पाहिले तेव्हा तो चकीत झाला. यानंतर त्याने खोदून तो दगड बाहेर काढला.
- विलिल्यम्सला जे डिव्हाइस मिळाले होते, त्यामध्ये ट्रिपल प्लग फॉर्मेट होते. म्हणजेच त्यामध्ये तीन प्लग लावलण्यात आलेले होते आणि ते एका दगडासोबत जोडलेले होते. यापेक्षा जास्त हैराण करणारी गोष्ट म्हणजे, जेव्हा भू-वैज्ञानिकांनी त्याची कार्बन तपासणी केली, तेव्हा सांगितले की, हे 1 लाख वर्षे जुने ऑब्जेक्ट आहे.
- या विचित्र कंपोनेंटची रुंदी जवळपास 8mm, तर उंची जवळपास 3mm, आणि पिनच्या मधील अंतर जवळपास 2.5mm  आहे. तर पिनची जाडी जवळपास 1 mm आहे.
- विलियम्सने एक्सपर्ट्सला हे तोडण्याची परवाणगी दिली नाही. परंतू याचा एक्स-रे काढण्यात आला तेव्हा कळाले की, हे ऑब्जेक्टच्या सेंटरमध्ये 'ओपेक इंटरनल स्ट्रक्चर' मिळाले. यासोबतच हलके मॅग्नेटिक अॅट्रॅक्शनही मिळाले.

 

मिळाली कोट्यावधींची ऑफर 
- या दगडाच्या डिव्हाइसला विलियम्सने 'पेट्राडोक्स' हे नाव दिले. हे डिव्हाइस आजच्या कंपोनेंट पॉवर प्लग प्रमाणेच दिसते.
- हे अनोखे डिव्हाइस विकण्याच्या बदल्यात विलियम्सला 5 लाख डॉलर(जवळपास 3.5 कोटी)ची ऑफर मिळाली आहे. परंतू त्याने हे विकण्यास नकार दिला.
- इंजीनियर यावेळी म्हणाला की, ही दुर्लभ कलाकृती विकण्यापेक्षा रिसर्चसाठी कामी आलेले चांगले. यानंतर अनेक साइंटिस्टला या पेट्राडोक्सवर रिसर्च करण्याची संधी मिळाली आहे.

 

 

बातम्या आणखी आहेत...