आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानवी दिल्ली - महाराष्ट्रातील केवळ १२ वर्षांच्या मुलाने वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर उपाय शाेधला आहे. बी.एस.रेवंत नंबुरी असे या मुलाचे नाव आहे. त्याने रस्ते अपघात व वाहनचाेरी टाळण्यासाठी चार अॅप्स तयार केले असून त्याच्या पेटंटसाठी अर्जही दाखल केले आहेत. केंद्रीय भूपृष्ठ परिवहनमंत्री नितीन गडकरी यांच्यासमाेर रेवंतचे यासंदर्भातील सादरीकरण झाले आहे. गडकरी यांनी रेवंतचे तंत्रज्ञान वास्तवात उतवण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे आश्वासन दिले आहे.
नागपूरच्या माउंट लिटरा झी स्कूलमध्ये सातवीत शिकणाऱ्या रेवंतने विकसित केलेल्या अॅपचा उपयाेग वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर देखरेख ठेवण्यासाठी हाेऊ शकेल. यामध्ये सीटबेल्ट सेन्सर, ब्रेथ अॅनालायझर, हार्ट रेट अॅनालायझरच्या माध्यमातून अधिकाऱ्याला सतर्क केले जाईल. रेवंतने विकसित केलेल्या दुसऱ्या अॅपमध्ये क्विक रिस्पाॅन्स(क्यूआर) काेडचा वापर करून नेटवर्क कनेक्टिव्हिटीशिवाय डाटा व दस्तएेवज प्रिंटिंग करता येऊ शकेल. अन्य अॅप्सद्वारे स्मार्ट कीच्या माध्यमातून हाेणारी चाेरी टाळता येऊ शकेल,असा दावा करण्यात आला आहे. सरकार व खासगी संस्था आपल्या तंत्रज्ञानाचा उपयाेग समाजासाठी करू शकतील. यासंदर्भात गडकरी म्हणाले, आपले मंत्रालय नवाेन्मेष आणि नव्या तंत्रज्ञानाला नेहमीच प्राेत्साहन देते. तंत्रज्ञानाच्या साहाय्याने अपघातांचे प्रमाण कमी करता येऊ शकते. भारतात वर्षाला ५ लाख रस्ते अपघात हाेतात. त्यात दीड लाख लाेकांचा मृत्यू हाेताे तर ३ लाखांना अपंगत्व येते.
आयुर्वेदात एमडी असलेल्या रेवंतीची आर्इ शिल्पा म्हणाल्या, सुरुवातीच्या त्याच्या प्रयत्नांकडे लक्ष गेले नाही. मात्र, त्याची संकल्पना परिपक्व व लक्षवेधक असल्याचे नंतर लक्षात आले. मालवाहतूक करणाऱ्या वाहनाने लाल सिग्नल असतानाही आपल्या कारला धडक दिली व ते वाहन निघून गेले. त्या वेळेस रेवंत माझ्यासाेबतच कारमध्ये हाेता. अखेर अशा दाेषी वाहनचालकांना का पकडले जात नाही, अशी विचारणा त्याने केली. यानंतर रेवंतने दाेन दिवसांत अॅप विकसित केले. त्यात वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांना ट्रेस करण्याची प्रणाली हाेती.
रेवंतला बाैद्धिक व्हेंचरची मदत
या घटनेनंतर शिल्पा यांनी नागपूरच्या बाैद्धिक व्हेंचर प्रा. लिमिटेडचे संचालक विवेक दहिया यांची भेट घेतली. रेवंतच्या आयुष्यातील हाच टर्निंग पाॅइंट ठरला. रेवंतचे विचार तर्कसंगत निष्कर्षापर्यंत नेण्यास मदत करण्याचे आश्वासन टीम बाैद्धिकने शिल्पा यांना दिले. बाैद्धिकने रेवंतच्या पेटंटसाठीही मदत करण्याचे आश्वासन दिले. टीम बाैद्धिक व रेवंत यांनी तीन पेटंटसाठी अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे वयाच्या अवघ्या १२ वर्षांत ४ पेटंटसाठी अर्ज करणारा रेवंत देशातील सर्वांत लहान संशाेधक ठरला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.