आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अर्धा तास पत्नीला मांडीवर घेऊन अँब्यूंलंसची मागणी करत होता पती, नंतर झाले असे...

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पिंजौर(हरियाणा)- रविवारी संध्याकाळी 6:30 वाजता पिंजौर गार्डनसमोरील मेन रोडवर बाइकवरून जात असलेले दाम्पत्याचा ट्रकसोबत अपघात झाला. या अपघातात खाली पडलेल्या महिलेच्या डोक्यावरून ट्रकचे चाक गेले. या अपघातात महिलेचा मृत्यू झाला. पोलिसांनी मृतदेहाला ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी कालका हॉस्पिटलच्या मॉर्चरीमध्ये पाठवले आहेत. पोलिसांनी घटनास्थळावरून ट्रकला जप्त केले आहे, तर ड्रायव्हर फरार झाला आहे.


मोरनीच्या भंगारमध्ये राहणारा गौतम शर्मा आपली पत्नी ज्योती शर्मासोबत मोटारसायकलीवरून टकसाल, परवाणूला जात होता. त्यांच्यासोबत गौतमचा लहान भाऊदेखील होता. पिंजौर गार्डनसमोरून जात असताना, पाठिमागून येणाऱ्या ट्रकने त्या दोघांना उडवले. या धडकेने गाडीवरील तिघेही खाली पडले आणि ज्योतीच्या डोक्यावरून ट्रकचे टायर गेले. एका महिन्यांपूर्वीच त्या दोघांचे लग्न झाले होते.

 
अपघात संध्याकाळी 6:30 वाजता झाला. डोक्यावरून ट्रकरचे टायर गेल्याने ज्योतीच्या डोक्यातून खूप रक्तस्त्राव झाला. रस्त्यावरच तडफत असलेल्या पत्नीच्या डोक्याला तिची ओढणी बांधून तिला मांडीवर झोपवले. त्यानंतर जोर-जोराने अँब्यूलंस मागवण्याची मागणी करत होता. यानंतर जमलेल्या गर्दीतील एकाने पिंजौरच्या प्रायमरी हेल्थ सेंटर(पीएचसी) आणि पोलिसांना फोन करून अँब्यूलंसला बोलवण्याची मागणी केली. पोलिस स्टेशन आणि पीएचसी घटनास्थळापासून फक्त 350 मीटर अंतरावर होती, तरीदेखील तिला पोहचण्यास उशीर झाला.


पिंजौर पोलिसांचे पीसीआरदेखील 20 मिनीट उशिराने पोहचले. घटास्थाळावर तपास करत असलेल्या ए.एस.आय लिखानाचे काम करू लागला. त्यावेळेसही गौतम ओरडत होता 'प्लीज अँब्यूलंसला बोलवा, माझी बायको वाचले.' दोन पोलिस कर्मचारी म्हणाले- ट्रॅफिक असल्याने अँब्यूलंसला येण्यास उशीर लागला. जमलेल्या नागरिकांनी पोलिसांवर राग व्यक्त करत पीसीआरमध्ये घेऊन जाण्याची मागणी केली. त्यानंतर पोलिसांनी महिलेला पीसीआरमध्ये पाठवले. पण तेथे पोहलल्यावर डॉक्टरांनी महिलेला मृत घोषित केले.