आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करालखनऊ- उत्तर प्रदेशातील लखनऊ येथे एका निर्दयी मातेने 3 महिन्यांच्या आजारी मुलास चौथ्या मजल्यावरून खाली फेकल्याची घटना घडली आहे. घटना किंग जॉर्ज मेडिकल युनिव्हर्सिटी ट्रॉमा सेंटरमध्ये घडली. या महिलेच्या मुलास लिव्हरचा आजार होता. त्याला कावीळही झालेली होती. ही घटना घडताच रुग्णालय परिसरात एकच खळबळ उडाली. डॉक्टर व कर्मचाऱ्यांतही हा चर्चेचा विषय होता.
पोलिसांना याची माहिती समजताच त्यांनी आरोपी महिलेस अटक केली आहे. मुलाच्या सततच्या आजारपणामुळे तिची मानसिक अवस्था चांगली नव्हती. त्यामुळे तिला 3 महिन्याच्या मुलाबद्दल प्रेमही उरलेले नव्हते. पोलिसांना दिलेल्या जबाबात तिने सांगितले, जन्मापासून तो आजारी असायचा. तो खूप अशक्त असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे होते. त्याच्यावर खूप दिवसांपासून उपचार सुरू होते. त्याच्या सततच्या रडण्याला व दुखण्याला कंटाळून तिने असा निर्दयी निर्णय घेतला. पोलिसांनी मुलाचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनास पाठवला. पुढील कारवाई सुरू असून महिलेवर गुन्हा नोंदवला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.