आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गंभीर आजारामुळे 4 महिन्यांच्या मुलास लावावे लागले हेल्मेट; त्याची कोणी थट्टा करू नये म्हणून आता घरातील सर्व मंडळीही वापरतात 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

न्यूयॉर्क- अमेरिकेतील टेक्सासमध्ये राहणाऱ्या गॅरी गुटरेज यांचे कुटुंबीय सतत हेल्मेट डोक्यावर ठेवून वावरतात. घरातही कोणतेही काम करताना ते हेल्मेट घालतात. गॅरीच्या कुटुंबीयांना हा प्रयास त्यांचा चार महिन्यांचा मुलगा जोन्ससाठी करावा लागत आहे. जोन्सला प्लेजियोसेफ्ली नावाचा आजार जडला आहे. या आजारात त्याच्या डोक्याचा आकार खूप मोठा झाला आहे. गॅरींनी त्याच्यावर खूप उपचार केले, पण त्यात फारशी सुधारणा झाली नाही. शेवटी डॉक्टरांनी मुलास हेल्मेट घातल्याने प्रकृतीत काही फरक पडेल, असा सल्ला दिला. चार महिन्यांच्या या मुलास कायम हेल्मेट वापरावे लागत आहे. त्याचा त्याला त्रासही होतो. परंतु त्याच्या डोक्याच्या आकारावरून कोणी थट्टा करू नये, म्हणून हेल्मेटचा सक्तीने वापर करण्याचा गॅरींनी निर्णय घेतला. यामुळे सर्वजण घरातही हेल्मेट वापरतात. 

 

बहिणीने जोन्ससाठी घातले हेल्मेट, इतरांनी केले तिचेच अनुकरण 
मुलासोबत घरातील इतर सदस्यांनीही हेल्मेट वापरणे सुरू केले. याची सुरुवात जोन्सच्या बहिणीने केली. मुले जर हेल्मेट वापरत असतील तर आपणही घरात हेल्मेट का वापरू नये, असे गॅरीला वाटले. 
 

बातम्या आणखी आहेत...