आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
नांदेड- देशाच्या इतिहासात ४०० वर्षांची जुनी परंपरा असलेल्या माळेगाव खंडोबा यात्रेत या वर्षी आर्यवीर गुरुचरणसिंग सिद्धू या ६ वर्षीय अश्वरोहकाच्या ७० किलोमीटर अंतराच्या घोडदौडीचा बहुमानाचा तुरा रोवला जाणार आहे.
५ जानेवारीला या तारखेस नांदेड जिल्हा अश्वमालक संघाचे सचिव व अश्वप्रेमी गुरुचरणसिंग सिद्धू यांचा ६ वर्षीय मुलगा आर्यवीर हा विक्रम करणार आहे. गुरुद्वारा येथे माथा टेकून तो गुरुद्वारा ते माळेगाव या ७० कि.मी. अंतराची घोडदौड करण्याचा विक्रम करणार आहे. नांदेडच्या इतिहासात प्रथमच एवढ्या कमी वयात एवढे मोठे साहस करणारा आर्यवीर हा पहिला अश्वरोहक ठरणार आहे.
आर्यवीरचा हा विक्रम माळेगाव यात्रेत आकर्षणाची बाब ठरणार आहे. नांदेड जिल्हा अश्वमालक संघाचे अध्यक्ष मनीष कावळे, उपाध्यक्ष नंदू दळवी, सचिव गुरुचरणसिंग सिद्धू, कोषाध्यक्ष भागवत सहसचिव अजय देशपांडे, सदस्य राहुल डोईफोडे आदी आर्यवीरच्या घोडदौड आयोजनात परिश्रम घेत आहेत.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.