आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

४० फूट लांब बसचे केले घरकुलात रूपांतर; अडीच लाख रुपये खर्चाच्या याच घरामधून निघाले जगभ्रमंतीला

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नॅशव्हिले - २७ वर्षीय चेज ग्रीन व २५ वर्षांच्या मारियाजोस ट्रेजोचे जगभ्रमंती करून जीवन जगण्याचे स्वप्न हाेते; परंतु स्वत:सारख्याच इतर तरुणांप्रमाणे आठ तासांची नाेकरी करून हे स्वप्न पूर्ण हाेणे शक्य नव्हते. त्यामुळे त्यांनी गतवर्षी स्वत:चे घर विकून स्वप्न पूर्ण करण्याचा निर्णय घेतला व रूटीन जॉब साेडून फ्रीलान्स वर्क करणे सुरू केले. त्यानंतर दाेघांनी आतापर्यंत व्हिस्काॅन्सिन, अॅरिझोना, प्युर्टोरिको, टेनेसी आदी अमेरिकेतील राज्ये पायाखालून घातली असून, संपूर्ण अमेरिका पाहल्यानंतर ते इतर देशांच्या प्रवासाला निघणार आहेत.


विशेष म्हणजे, हा प्रवासही त्यांनी खूपच स्टायलिशपणे पूर्ण केला. त्यासाठी दाेघांनी एका ४० फूट लांब स्कूल बसचे आलिशान घरात रूपांतर केले. त्यावर त्यांचे ३,५०० डॉलर्स म्हणजे सुमारे २ लाख ४२ हजार रुपये खर्च झाले. या बस वजा घरात बेडरूम,  बाथरूम, टॉयलेट, शाॅवर, १०० गॅलन पाण्याची टाकी, फ्रिज, किचन सिंक व फ्रीझरही आहे. तसेच या घराच्या छतावर सोलर पॅनलही असून, हे घर दाेघांनी चार महिने परिश्रम घेऊन तयार केले. आता याच बस वजा घरामधून ते जगभ्रमंतीला निघाले आहेत. 


अगाेदर दोन हजार स्क्वेअर फुटांच्या घरात हाेते अमेरिकी दांपत्य
याबाबत चेजने सांगितले की, आम्ही यू-ट्यूबवर बस, व्हॅन आदी वाहनांचे घरात रूपांतर केल्याचे अनेक व्हिडिआे पाहिले हाेते. मला अशा प्रकारचे जीवन जगणे आवडते, हे माझ्या वडिलांना ठाऊक हाेते. त्यामुळे त्यांनीच मला व मारियाजोसला स्वप्नातील आलिशान बस वजा घर तयार करण्यास प्राेत्साहन दिले. त्यापूर्वी आम्ही  दोन हजार स्क्वेअर फुटांच्या घरात राहत हाेताे. आम्हा दाेघांसाठी ते घर खूप माेठे हाेते. त्यामुळे आम्ही नाेकरी साेडून बसला घर बनवून टाकले. मी ग्राफिक डिझायनर, तर मारियाजोस मेकअप आर्टिस्ट आहे. त्यात आम्ही फ्रीलान्सिंगचेही काम करताे. त्यातून आम्हाला बऱ्यापैकी पैसे मिळतात.


जिवंत आहाेत ताेपर्यंत भटकंती करत राहू : माझ्यासारखे जीवन जगू इच्छिणाऱ्यांना माझे सांगणे आहे की, सर्व काही साेडून जगभ्रमंती करणे दिसते तितके साेपे नाही. त्यासाठी स्वत:कडे पुरेसे पैसे असणे गरजेचे आहेत. तसेच प्रवासात येणारे अडथळे, हाेणारा त्रास सहन करण्याचीही तयारी हवी. हेच लक्षात ठेवून आम्ही दाेघे प्रवासापूर्वी याेग्य ते नियाेजन करताे; परंतु तरीही काही ना काही अडचणी येतातच. असे असले तरी जिवंत आहाेत ताेपर्यंत आम्ही जगभर फिरत राहण्याचे ठरवले आहे, असेही दाेघांनी सांगितले.


 

बातम्या आणखी आहेत...