Home | News | A 40-year-old cancer patient said to Ajay Devgan, 'Close the advertisement for tobacco products'

अपील : अजय देवगणला 40 वर्षांचा एक कॅन्सर पेशंट म्हणाला - 'बंद करा तंबाखू उत्पादनांची जाहिरात', दिल्ली सरकारनेही पाठवली नोटीस 

दिव्य मराठी वेब टीम  | Update - May 06, 2019, 04:13 PM IST

सांगनेरच्या आसपास चिकटवले गेले 1000 पॅम्पलेट... 

 • A 40-year-old cancer patient said to Ajay Devgan, 'Close the advertisement for tobacco products'

  बॉलिवूड डेस्क : जयपुरच्या एका कॅन्सर पेशंटने अजय देवगणला अपील केली आहे की, त्याने तंबाखू उत्पादनांची जाहिरात करणे बंद करावे. 40 वर्षीय नानकरामच्या कुटुंबाचे म्हणणे आहे की, तो अजयचा चाहता होता आणि तो त्याच तंबाखू प्रोडक्टचे सेवन करायचा, ज्या प्रोडक्ट्ची जाहिरात त्याचा सुपरस्टार करतो. पण आता त्याला जाणीव झाली आहे की, तंबाखूने त्याचे आयुष्य पुरते बरबाद करून टाकले आहे.

  सांगनेरच्या आसपास चिकटवले गेले 1000 पॅम्पलेट...
  नानकरामने जयपुरच्या टाउन सांगनेर, जगतपुरा आणि आसपासच्या भागांमध्ये सुमारे 1000 पॅम्पलेट वाटले आणि दिवाळीला भिंतींवर चिकटवले आहेत. आणि यामध्ये अजय देवगणला विचारले गेले आहे की, ते आणि त्यांची फॅमिली किती पान मसाला खाते ? नानकरामचा मुलगा दिनेश मीणाने एका एजेंसीसोबतच्या बातचितीमध्ये सांगितले की, "माझ्या वडिलांनी काही वर्षांपूर्वी त्याच ब्रांडची तंबाखू खायला सुरुवात केली, ज्याची जाहिरात अजय देवगण करतो. त्यांना अजय खूप आवडतो. पण जेव्हा त्यांना कँन्सर झाला त्यांना याची जाणीव झाली की, अजय सारख्या मोठ्या स्टारने अशा उत्पादनांची जाहिरात केली नाही पाहिजे."

  पॅम्पलेटमध्ये नानकरामने हे लिहिले...
  नानकरामने लिहिले की, दारू, सिगारेट आणि तंबाखू सारख्या उत्पदनांच्या जाहिराती घातक आहेत. अभिनेत्यांनी अशा उत्पादनांना प्रमोट केले नाही पाहिजे. दोन मुलांचे पिता नानकराम आधी चहाही दुकान चालवायचे. पण आता ते बोलू शकत नाहीत आणि कुटुंबाला सांभाळण्यासाठी ते सांगनेरमध्ये आपल्या घरूनच दूध विकण्याचे काम करत आहेत.

  दिल्ली सरकारने पाठवली आहे अजयला नोटिस...
  2016 मध्ये दिल्ली सरकारने अजय देवगणच्या नावाने एक नोटिस पाठवली आहे, ज्यामध्ये म्हणले गेले होते की, त्याने सिगारेट आणि दुसऱ्या तंबाखू प्रोडक्ट्सच्या जाहिरातीमध्ये कशाही पद्धतीने सामील होऊ नये. नोटिसमध्ये लिहिले होते, "पान मसाल्याच्या जाहिरातीचा वापर ब्रांडच्या प्रचारासाठी केला जात आहे, जे ग्राहकांना विशेषतः अल्पवयीन मुलांना जास्त प्रभावित करत आहे. सिगारेट आणि दुसऱ्या तंबाखू उत्पादन एक्ट (COPTA) 2003 च्या कलाम 5 नुसार असे वॉयलेशनची जबाबदार ती तंबाखू कंपनी असते, पण जाहिरातीमध्ये दिसल्यामुळे तुम्ही (अजय) देखील याचे वॉयलेशन करत आहात. त्यामुळे या लेटरद्वारे आपल्याला अशा जाहिरातीत न दिसण्याची सक्त नोटिस दिली जात आहे. हे केवळ ग्राहक भ्रमितच करत नाही, तर तंबाखू प्रोडक्ट्सला प्रात्साहनही देत आहे." यापूर्वी सरकारने शाहरुख, अरबाज, अजय आणि गोविंदा यांच्या पत्नींना लेटर सांगितले होते की, त्यांनी आपापल्या पतीला अशा जाहिराती करण्यापासून रोखावे.

Trending