Home | International | China | A 53 year old man go to office by swimming

५३ वर्षीय वृद्धाने शोधला वाहतूक कोंडी टाळण्याचा उपाय; अशाप्रकारे प्रवास करून गाठतात ऑफिस

वृत्तसंस्था | Update - Apr 24, 2019, 12:00 PM IST

गेल्या ११ वर्षांपासून रोज नदीतून पोहून जात फक्त ३० मिनिटांत गाठतात ऑफिस

  • A 53 year old man go to office by swimming
    बीजिंग - चीनमध्ये एक व्यक्ती दररोज नदीतून पोहून जात आॅफिसला पोहोचते. वुहान येथील रहिवासी झू बिवू (५३) याने वाहतूक कोंडी टाळण्यासाठी हा मार्ग शोधून काढला आहे. गेल्या ११ वर्षांपासून ते ऑफिसला पाेहून जातात. ऑफिसला जाण्यासाठी त्यांना २.२ किमी दूर अंतर पाेहून जावे लागते. यासाठी त्यांना ३० मिनिटे वेळ लागतो, तर रेल्वेने जाण्यासाठी १ तास लागतो. स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, झू हेनयांग जिल्ह्यात राहतात. ते वुचांग येथील एका फूड मार्केटमध्ये मॅनेजर आहेत. झू यांनी सांगितले, केवळ वेळ वाचावा म्हणून नव्हे, तर निरोगी राहण्यासाठी नदीतून पोहून ऑफिसला जातो. झू सकाळी ७ वाजता नदीवर जातात. कपडे, बूट व अन्य वस्तू काढून एका वॉटरप्रूफ बॅगेत ठेवतात. नंतर नदीत उडी घेतात. नदी ओलांडल्यानंतर कपडे घालून ऑफिसकडे जातात.

Trending