आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिवंत समाधीचा तमाशा : 5 फूट खोल खड्यामध्ये जाऊन बसला साधू, आनंदाने पूजा पाहत होते पत्नी आणि मुले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भिलवाडा, राजस्थान - येथील एका भागामध्ये अंधश्रद्धेची चकित करणारी घटना समोर आली आहे. एका बाबाने येथे नवरात्रीच्या पहिल्या दिवशी समाधी घेण्याचा प्रयत्न केला. परंतु घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच पोलीस पोहोचले आणि खड्ड्यामध्ये बेशुद्ध पडलेल्या साधूला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले.

 

- आसींद पोलीस स्टेशन हद्दीतील कुराछो येथील खेडा गावात राहणारे 35 वर्षीय भोपा श्रावण उर्फ धीरज खारोल यांनी काही वर्षांपूर्वी घरदार सोडून सन्यास घेतला आहे. त्यांनी काही दिवसांपूर्वी समाधी घेणार असल्याचे गावकऱ्यांना सांगितले होते. अंधश्रद्धेमध्ये बुडालेल्या गावकऱ्यांनी डिंगोडीया देवी मंदिराजवळ पाच फूट खोल आणि  सव्वा फूट रुंद पक्क्या विटांचा खड्डा तयार केला. त्यानंतर बाबा 10 ऑक्टोबरला सकाळी खड्ड्यामध्ये जाऊन बसले.


- व्हडिओ समोर येताच एसएचओ मनीष देव वेळीच घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी बाबाला खड्यातून बाहेर काढून हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले. बाबांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जाताना लोक त्यांच्या पाया पडत होते.


- स्थानिक लोक सांगतात की, 1400 वर्षांपूर्वी कृपाराम नावाच्या एका संताने समाधी घेतली होती. भोपा समाधी घेत असताना त्याचे संपूर्ण कुटुंब तेथे उपस्थित होते. भोपाच्या कुटुंबामध्ये पत्नी व्यतिरिक्त 2 मुले आणि एक मुलगी आहे.

 

बातम्या आणखी आहेत...