आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • A Beautician Girl Lost Her Ring 12 Years Ago Has Finally Found It – Up Her Nose

एका शिंकेने उलगडले महिलेचे 12 वर्षे जुने रहस्य, ज्याने पाहिले तो झाला हैराण 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन. ब्रिटेनमध्ये एका मुलीला तिची 12 वर्षांपुर्वी हरवलेली अंगठी मिळाली. पण ही अंगठी कुठेही हरवली नव्हती, तर प्रत्येक क्षणी तिच्यासोबत होती. न्यूज साइट मेट्रोनुसार, ही अंगठी 20 वर्षांची मुलगी अबिगेलच्या नाकात अडकलेली होती. एक ब्यूटीशियन असणा-या अबिगेलला ही अंगठी तिच्या 8 व्या वाढदिवशी मिळाली होती. 


- मुलीने सांगितले की, तिची ही अंगठी अचानक गायब झाली. तिला वाटले की, ती कुणीतरी चोरली असेल. पण एकदा ती मित्रांसोबत आपल्या घरात बसलेली होती, तेव्हाच तिला एक मोठी शिंक आली आणि तिची ही अंगठी नाकातून बाहेर पडली. 
- शिंक येताच मुलीने तात्काळ टिशू पेपरने नाक कव्हर केले. पण तिने पाहिले तर अंगठी टिशू पेपरला चिटकलेली होती. यादरम्यानचे दृष्य पाहून तिचे फ्रेंड्स हैराण झाले होते. 
- तिने सांगितले की, गेल्या 12 वर्षांपासून ही अंगठी तिच्या नाकात अडकलेली होती. पण तिला थोडाही त्रास झाला नाही. पण अबिगेलने सांगितले की, काही दिवसांपुर्वीपासून तिला तिच्या नाकात काहीतरी चमकताना दिसत होते. 
- अबिगेलने सांगितले की, त्यादिवशी तिला खुप वेळा शिंक आली होती. यानंतर मी माझे नाक स्वच्छ करण्यासाठी गेले. तिला काहीतरी चमकताना दिसत होते. एकदा मोठी शिंक आल्यानंतर अंगठी तिच्या हातात आली. 
 

बातम्या आणखी आहेत...