आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्पेनमध्ये बायोलॉजीच्या शिक्षिकेने मुलांना शरीररचनाशास्त्र शिकवण्यासाठी घातला अॅनाटाॅमीचा विशेष सूट

2 वर्षांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक

माद्रिद : मुलांना अॅनाटॉमी (शरीररचनाशास्त्र)शिकवण्यासाठी वापरलेल्या पद्धतीमुळे एक शिक्षिका जगभरात प्रसिद्ध ठरली आहे. वेरोनिका डक यांनी स्विमिंग सूटवर शरीरातील अंतर्गत अवयवाचे चित्र काढले होते. त्याद्वारे मुलांना शरीरात कोणकोणते अवयव असतात याची माहिती दिली. मुलांना िशकवण्याच्या या पद्धतीस टि्वटरवर ६५३०० हून अधिक लोकांनी पसंती दिली. तसेच १३ हजार वेळा रिटि्विट केले आहे. वेरोनिका शाळेत गेल्या १५ वर्षांपासून जीवशास्त्राची शिक्षिका आहे. त्या तिसरीच्या वर्गातील मुलांना विज्ञान, इंग्रजी, कला, सामाजिक शास्त्र व स्पॅनिश भाषा शिकवतात.

४३ वर्षीय वेरोनिका यांनी सांगितले, ८ ते ९ वर्षांच्या मुलांना शरीराची रचना समजून सांगण्यात अडचणी येत होत्या. एकदा इंटरनेटवर सर्फिंग करताना त्यांना मुलांना अशा प्रकारे शिकवण्याची कल्पना सुचली. यानंतर त्यांनी स्विम सूटवर अंतर्गत अवयवांची चित्रे छपाई करून घेतली. या सूटवर शरीरातील अवयव योग्य ठिकाणी दाखवले होते. या पद्धतीने मुलांना शरीराची आतील रचना कशी असते हे समजले. मुले खुश झाली. वेरोनिका यांनी यापूर्वीही नाम, उभयान्वयी अवयव व क्रियापदे शिकवताना कार्डबोर्डाचा वपर केला आहे. शिक्षक काहीच शिकवत नाहीत, हा काही लोकांचा समज त्यांनी खोटा ठरवला आहे.