आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

CRPF जवानांच्या बसच्या इतकी जवळ पोहोचली होती कार, मग झाला स्फोट; थोडा उशीर झाला असता तर पुलवामाची झाली असती पुनरावृत्ती

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जम्मू-काश्मीर - येथील श्रीनगर-जम्मू हायवेवर जवाहर टनलजवळ एका सेन्ट्रो कारमध्ये स्फोट झाला. स्फोटावेळी सीआरपीएफचा ताफा येथून जात होता. मीडिया रिपोर्ट्सनुसार ताफ्यामध्ये 6 ते 7 बस होत्या. स्फोटामुळे एका बसला थोडेसे नुकसान झाले. यामध्ये कोणतीही जीवित हानी झाली नसल्याचे समजते आहे.  

कारमध्ये होत्या ज्वलनशील वस्तू 

मीडिया रिपोर्ट्सनुसार कारचा स्फोट होताच चालक फरार झाला. CRPFच्या ज्या बसमध्ये डेंट आला त्यात 40 जवान होते. कारच्या चिंधड्या उडाल्या असून बसच्या मागे स्फोटाचा किरकोळ परिणाम झाल्याचे स्फोटानंतर समोर आलेल्या फोटोमध्ये दिसत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार स्फोट झालेल्या कारमध्ये यूरिया, तेलाची बाटली आणि सिलींडर सारखे ज्वलनशील वस्तू आढळून आल्या आहेत. 

CRPF: Today around 1030 hrs, an explosion took place in a civil car near Banihal, J&K while CRPF convoy was on move. The car caught fire & slight damage was caused in the rear of one of the CRPF vehicle. No injuries were caused to CRPF Personnel. Incident being investigated. pic.twitter.com/NmvPuPO2df

— ANI (@ANI) 30 March 2019

- सिलींडरचा फुटल्यामुळे कारमध्ये स्फोट झाल्याचे प्राथमिक पडताळनीत समजत आहे. स्फोट झालेल्या ठिकाणाच्या काही अंतरावरून सीआरपीएफचा ताफा जात होता. हे एखाद्या हल्ल्यासारखे वाटत नाही. पण सध्या तपास सुरू असल्याची माहिती सीआरपीएफच्या सुत्रांकडून मिळाली आहे. 

CRPF: Today around 1030 hrs, an explosion took place in a civil car near Banihal, J&K while CRPF convoy was on move. The car caught fire & slight damage was caused in the rear of one of the CRPF vehicle. No injuries were caused to CRPF Personnel. Incident being investigated. pic.twitter.com/NmvPuPO2df

— ANI (@ANI) 30 March 2019
बातम्या आणखी आहेत...