आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअमरावती(आंध्रप्रदेश)- येथील पुर्व गोदावरी जिल्ह्यात आज(रविवार) दुपारी 61 पर्यटकांना घेऊन नाव गोदावरी नदीत उलटली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नाव आंध्र पर्यटन विकास निगम द्वारे चालवण्यात येत होती आणि यात 11 क्रू मेंबर आणि 50 पर्यटक होते. अपघातात 12 जणांचा मृत्यू झाला तर 31 जण बेपत्ता आहेत. दरम्यान, एनडीआरएप कडून 17 जणांना वाचवण्यात यश आलं आहे. या परिसरात झालेल्या जोरदार पावसामुळे गोदावरीत पाण्याचा वेग जास्त असल्याने, बचाव कार्यात अडथळा येत आहे.
पोलिस अधीक्षक अदनान नईम असमी यांनी सांगितले की, प्रमुख पर्यटन स्थळ पापीकोंडालुमधून रवाना झालेली नाव कच्छलुरूजवळ उलटली. प्रशासनाने बुडालेल्या व्यक्तींचा शोध घेण्यासाठी हेलिकॉप्टरच्या साहाय्याने शोधमोहीम सुरू आहे. पाण्याची पातळी आणि वेग जास्त असल्यामुळे शोध मोहिमेत अडथळा येत आहे. दरम्यान, अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांनी 10-10 लाख रुपये भरपाईची घोषणा केली आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.