आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अजय देवगणच्या जीवन प्रवासावर लिहिले जाणार पुस्तक, प्रेम कथा केली जाऊ शकते यामध्ये सामील 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : अजय देवगणने 90 च्या दशकात 'फूल और कांटे' चित्रपटाने हिंदी फिल्म इंडस्ट्रीमध्ये डेब्यू केला होता. आपल्या 28 वर्षांच्या करिअरमध्ये अजयने अनेक चढउतार पाहिले. अजय एक यशस्वी अभिनेता होण्याबरोबरच एक निर्माता, दिग्दर्शक आणि पती-पिता देखी आहे. सूत्रांनी सांगितल्याप्रमाणे लवकरच त्याची बायोग्राफी लिहिली जाऊ शकते.  

रंजक असू शकते अजयच्या जीवनावर आधारित असलेले पुस्तक - सूत्र... 
सूत्रांनी सांगितले की, "अजयची जीवन कथा खूप प्रेरणादायी आहे. कारण इंडस्ट्रीमध्ये असूनही त्याने खूप संघर्ष करून हे यश मिळवले आहे. तो अॅक्शन डायरेक्टर वीरू देवगण यांचा मुलगा आहे. पण पहिला चित्रपट हिट झाल्यानंतरही त्याने आपल्या करिअरमध्ये खूप चढ उतार पहिले आहेत. त्याची आणि काजोलची प्रेम कथा, त्याचे इंडस्ट्रीमधील रिलेशन्स इत्यादींबद्दल लिहिले जाणे खूप रोचक असू शकते. हेच कारण आहे की, त्याच्या आयुष्यावर आधारित पुस्तकाबद्दल विचारले गेले आणि जर सर्व प्लॅननुसार झाले तर लवकरच कळेल की, त्याची बायोग्राफी लिहिली जाणार आहे की, नाही" मात्र याची अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही. 

पुढच्यावर्षी येणार अजयचे अनेक चित्रपट... 
वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर तो याआधी कॉमेडी चित्रपट 'दे दे प्यार दे' मध्ये दिसला होता, जो बॉक्स ऑफिसवर सक्सेसफुल झाला होता. पुढच्यावर्षी त्याचा 'तानाजी : अनसंग वॉरियर', 'तुर्रम खां', 'भुज : द प्राइड ऑफ़ इंडिया' आणि 'मैदान' रिलीज होऊ शकतो. याव्यतिरिक्त तो 'सूर्यवंशी' आणि 'आरआरआर' मध्येदेखील कॅमियो करतानादेखील दिसणार आहे. 

बातम्या आणखी आहेत...