Home | Maharashtra | Marathwada | Aurangabad | A boy attack on his friend due to small reason 

टपली मारण्यास विरोध; दहावीच्या विद्यार्थ्याचा वर्गमित्रावर कटरने वार; 16 वर्षीय मुलाच्या पाठीवर पडले तब्बल 50 टाके 

प्रतिनिधी | Update - Jan 13, 2019, 10:57 AM IST

काही दिवसांपूर्वी आरोपी विद्यार्थ्याने त्याच्या पिडीत मित्राला ज्योतीनगर भागातील एका मैदानात नेऊन मारहाण केली होती.

  • A boy attack on his friend due to small reason 

    औरंगाबाद- कोचिंग क्लासमध्ये शिकणाऱ्या मुलाला डोक्यात टपली मारण्यास विरोध केला म्हणून एका मुलाने कटरने वार करून गंभीर जखमी केल्याची घटना शुक्रवारी दुपारी साडेचारच्या सुमारास घडली. गणेश सुनील काळे (१६) असे जखमी मुलाचे नाव असून त्याच्या पाठीवर ५० टाके पडल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्याच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून जवाहरनगर पोलिस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे. अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल करण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले.

    गणेश हा इयत्ता दहावीत शिकत असून तो रोपळेकर चौकाजवळ असलेल्या एका मोठ्या शिकवणीत जातो. त्या शिकवणीत गणेशवर वार करणारा शिवाजीनगर भागातील सोळा वर्षांचा मुलगा येतो. तो वर्गात सर्व मुलांच्या डोक्यात टपली मारत असे. यावरून त्याचा आणि गणेशचा वाद झाला होता. काही दिवसांपूर्वी त्याने गणेशला ज्योतीनगर भागातील एका मैदानात नेऊन मारहाण केली होती. मात्र, गणेशने हा प्रकार घरी सांगितला नव्हता. शुक्रवारी हा मुलगा कटर घेऊन वर्गात आला आणि त्याने गणेशच्या पाठीवर सपासप वार केले. गणेशला तत्काळ एका खासगी रुग्णालयात दाखल केले. त्याच्यावर आयसीयूत उपचार सुरू आहेत. कटरचा वार किमान १८ एमएम खोल असल्याचे वैद्यकीय अहवालातून समोर आले आहे. शनिवारी दुपारी जवाहरनगर पोलिस ठाण्याचे निरीक्षक शरद इंगळे, सहायक पोलिस निरीक्षक श्रद्धा वायदंडे, हवालदार दत्ता बोडखे, सुरेश नरवडे यांनी गणेशचा जवाब नोंदवला. हल्ला करणारा मुलगा फरार झाला असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

Trending