अभिनेता सलमान खान आणि त्याचा बॉडीगार्ड शेराविरुद्ध तक्रार दाखल, व्हिडीओ बनवत असलेल्या तरुणाला मारहाण केल्याचा आहे आरोप

सलमानने रागात जबरदस्ती पकडला होता त्याचा मोबाइल... 

दिव्य मराठी

Apr 25,2019 03:58:00 PM IST

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि त्याचा बॉडीगार्ड शेराविरुद्ध मुंबईच्या डीएन नगर पोलीस स्टेशनमध्ये एका तरुणाने तक्रार दाखल केली आहे. त्याने आरोप केला आहे की, व्हिडीओ बनवत असताना सलमान आणि शेराने त्याला मारहाण केली.

पोलिसांनी सांगितल्याप्रमाणे, सलमान संध्याकाळी डीएन नगरच्या भागात सायकल चालवत होता. याचदरम्यान एक तरुण त्याच्या मोबाइलमध्ये व्हिडीओ शूट करू लागला. तो सुमारे 20 मिनिटे सलमानचा व्हिडीओ बनवत राहिला. मात्र त्यांनतर एकाएकी सलमानला खूप राग आला. सलमानने रागात जबरदस्ती त्याचा मोबाइल पकडला. याव्यतिरिक्त सलमान आणि त्याच्या बॉडीगार्डने त्याला मारहाणही केली.

या घटनेनंतर पीडित तरुणाने डीएन नगर पोलीस स्टेशनमध्ये सलमान आणि शेरा यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली. सध्या पोलीस संपूर्ण प्रकरणाचा तपस करत आहे. त्यानंतर पुढील कारवाई केली जाईल.

X