आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खूप सहन केलेस आई, तुला दुसऱ्या विवाहासाठी शुभेच्छा; केरळच्या गाेकुळने आईसाठी लिहिली भावूक पाेस्ट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

तिरुवनंतपुरम - केरळातल्या काेल्लम येथील गाेकुळ श्रीधर यांनी आपल्या आईच्या दुसऱ्या विवाहानिमित्त एक भावूक पाेस्ट लिहिली. गाेकुळने लिहिले - माझ्या आईने तिच्या पहिल्या लग्नात खूप दु:ख, छळ सहन केला. घरी मानसिक, शारीरिक हिंसाचाराची बळी ठरली. हे सर्व तिने माझी सुरक्षितता आणि भविष्यासाठी केले. तिच्या नव्या जीवनाचा मला खूप आनंद झाला आहे. तिने माझ्यासाठी खूप त्याग केला. आपल्या वैवाहिक जीवनात खूप काही सहन केले, अनुभव घेतले. तिच्या शारीरिक छळाचा मी साक्षीदार आहे. तिच्या डाेक्यातून रक्त वाहताना मी पाहिले. माझ्यासाठी तिने आपले सर्व  जीवन समर्पित केले.  आता तिची वेळ आहे. तिची अनेक स्वप्ने मला पूर्ण करायची आहेत. माझ्याकडे बाेलण्यासाठी जास्त काही नाही. त्यांचे लग्न मला काेणापासून लपवायचे नाही. ‘आई तुला वैवाहिक जीवनाच्या शुभेच्छा..’


लोकांकडून काैतुक म्हणाले-  मुलाचे कर्तव्य पार पाडले
गाेकुळ म्हणताे, ही पाेस्ट लिहिण्याआधी मी कचरत हाेताे. माझे हे विचार समाजाच्या एका वर्गात स्वीकारले जाणार नाही, असे मला वाटत हाेते. मग मला जाणीव झाली की मला काेणापासून काही लपवण्याची गरज नाही. माझा हा आनंद मी सर्वांबराेबर वाटून घेण्याचा निर्णय घेतला. अनेक लाेकांनी गाेकुळचा हा निर्णय साहसी आणि चांगला असल्याच्या भावना व्यक्त केल्या. तू मुलाचे कर्तव्य पार पाडले, असे लाेकांनी काैतुकाने लिहिले.