आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वडिलांसाठी शोधला गोड पदार्थाचा स्वस्त, स्वादिष्ट पर्याय

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अठरा वर्षांच्या झेविअर लारागौतीला आपल्या वडिलांना मधुमेह झाल्याचे समजल्यावर खूप चिंता वाटू लागली. मेक्सिको सिटीतील एका महाविद्यालयात केमिकल इंजिनिअरिंग करणाऱ्या या विद्यार्थ्याने आपले शिक्षण वडिलांसाठी गोड पदार्थाचा सुरक्षित आणि स्वस्त पर्याय शोधण्यासाठी समर्पित करण्याचा निश्चय केला. झेविअरने द गार्जियनला सांगितले, की त्याच्या वडिलांनी स्टिविया आणि अन्य उपलब्ध पर्याय वापरुन पाहिले, पण त्यांना त्यांची चव आवडली नाही आणि ते लपूनछपून गोड पदार्थ खात राहिले. त्यामुळे त्यांची ग्लुकोजची पातळी वारंवार वाढत असे. गोड पदार्थांच्या जवळपास सर्व उपलब्ध पर्यायांना वडिलांनी नकार दिल्यावर कुठला तरी नवा पर्याय शोधण्याचे आव्हान त्याच्यापुढे होते. त्यासाठी त्याने जायलिटोलपासून काम करायला सुरवात केली. अनेक भाज्या आणि फळांमध्ये आढळणारे हे गोड अल्कोहोल आहे. याचा उपयोग ज्युईंगम आणि मुलांसाठीच्या औषधांमध्ये होतो, पण त्याचे काही दुष्परिणामही आहेत. झेविअरने सांगितले, 'दुष्परिणाम असले तरी याचे मानवी आरोग्यासाठी अनेक फायदेही आहेत आणि त्याची चवही साखरेसारखी आहे. मात्र, ते काढण्याची प्रक्रिया महागडी होती. त्यामुळे सामान्य लोकांना उपलब्ध व्हावे, यासाठी मी ते काढण्याचीस्वस्त पद्धत शोधू लागलो.' झेविअरने कणसातील दाणे काढल्यावर उरलेल्या भागाचा इंधनासारखा वापर करीत जायलिटोल काढण्याचा स्वस्त मार्ग शोधून काढला आणि त्याचे पेटंटही घेतले. झेविअरला या संशोधनानंतर दोन कोटींचा पुरस्कार मिळाला. कारण स्वस्त जाायलिटोल मिळाल्यानंतर ज्यामध्ये आजवर साखरेचा वापर होतो अशा उत्पादनांमध्ये त्याचा उपयोग करणे शक्य होईल.  पुरस्काराच्या रकमेतून जायलिटोलचे उत्पादन दहापट वाढवण्याचे झेविअरने ठरवले आहे. आपल्या या शोधामुळे आता आपले वडील साखर असलेल्या उत्पादनांपासून दूर राहतील, याचा आनंद असल्याचे तो सांगतो.