आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

12 वीची परीक्षा टाळण्यासाठी छोट्या पुतण्याच्या अपहरणाचे नाटक, याआधीही गेला होता पळून

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

​​​​​​मुरैना : साधारणत: अनेक विद्यार्थी बोर्डाची परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी व कॉप्या करण्यासाठी अनेक युक्त्या लढवतात. परंतु मध्य प्रदेशातील १२वीतील एका विद्यार्थ्यांने आपल्याच तीन वर्षांच्या पुतण्याचे अपहरण केले. कारण या कारणासाठी त्याला पुतण्यास शोधण्याचे काम लागेल व परीक्षेला दांडी मारण्याची संधी मिळेल, असे त्याला वाटले. 

त्याने घरात एक चिठ्ठी लिहून टाकली की, तुमचा मुलगा  जिवंत हवा असेल तर रणवीरचे  (१९) शिक्षण थांबवा. या मजकुरावरूनच पोलिसांनी त्याला पकडले. दाेरखंडाने बांधलेल्या पुतण्यास सोडवले. 

हे प्रकरण मुरैनातील जौरा भागाचे  आहे. पुरा गावातील नेमीचंद कुशवाह रविवारी पत्नी व मुलांसह एका लग्नास गेले होते. तेथून त्यांचा मुलगा आशिक (३) बेपत्ता झालेला आढळला. शोधूनही तो सापडला नाही. म्हणून पोलिसांत तक्रार दिली. 

चिठ्ठीत म्हटले- रणवीर हुशार पण तो शिकणार नाही

पोलिसांना घटनास्थळी सापडलेल्या चिठ्ठीत म्हटले, रणवीर अभ्यासात हुशार आहे. पण आता तो शिकणार नाही. हे मंजूर असेल तरच आशिक सापडेल. नाही  एेकले तर आशिकचा मृत्यू ठरलेला. तुम्हाला काय पाहिजे? रणवीरचे शिक्षण की आशिकचा मृत्यू. तुमच्याकडे वेळ कमी आहे. हुशारी केली तर याद राखा. 

दहावीत तीन वेळा नापास; स्वत:च पळूनही गेला होता

एसपी डॉ. असित यादव म्हणाले, रणवीर अभ्यासात ढ आहे. दहावीतही तो तीनवेळा नापास झालेला आहे. दरम्यान, तो पळूनही गेला होता. काही अज्ञात लोकांनी मला पळवून नेलेले आहे. त्यानंतर तो ग्वाल्हेरला सापडला होता. रणवीरची कसून चौकशी केल्यानंतर त्यानेच कबुलीत ही माहिती दिली होती. 

सीबीएसई बोर्ड : दिल्लीच्या दंगलग्रस्त भागातील १०वी व १२ वीच्या ९२% मुलांनी दिली परीक्षा

नवी दिल्ली : दिल्लीच्या दंगलग्रस्त उत्तर-पूर्व भागात सोमवारी सीबीएसई बोर्डाची परीक्षा झाली. येथे परीक्षेत १० वी व १२ वीच्या ९२% मुलांनी परीक्षा दिली. सीबीएसई बोर्डाचे सचिव अनुराग त्रिपाठी यांनी सांगितले, सोमवारी १० वीच्या संगीत व  १२ वीचा भौतिकशास्त्राचा पेपर होता. दरम्यान, कोणत्याही प्रकारचा अडथळा आला नाही. बोर्डानुसार, दिल्लीच्या दंगलग्रस्त भागात २८३७ व १२ वीचे २८८८ परीक्षार्थी होते. 

बातम्या आणखी आहेत...