आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुधवाल्याने दिला आवाज, प्रतिसाद न मिळाल्यामुळे शेजाऱ्यांना बोलवले.... दरवाजा तोडल्यानंतर समोर तडफडत होता मुलगा, आत जाऊन पाहिले तर सर्वच झाले शॉक्ड

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पतियाळा (पंजाब) : येथे मोठ्या मुलाने आपल्याच आई-वडिलांना विष पाजून स्वतः आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. अमली पदार्थांची तस्करीच्या आरोपात 3 महिन्यांपासून तुरुंगात असलेल्या मुलाला सोडवण्याचा प्रयत्न करत होते. याचाच राग मनात धरून मोठ्या मुलाने त्यांना विष पाजले. पिता मोहनलाल यांचा तत्काळ मृत्यू झाला तर तडफडत असलेली आई मधु सिंगची वाचण्याची शक्यता असल्यामुळे तिचा गळा घोटून खून केला. शालीन ऊर्फ शानू असे आरोपीचे नाव आहे. दोघांना विष दिल्यांनतर त्यांच्या मृतदेहाचा बंदोबस्त करण्यासाठी 24 तासांपर्यंत प्रयत्न केले पण यश आले नाही. अखेर गुरुवारी रात्री साडे आठ वाजता स्वतः विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. शेजारी अचानकपणे घरी आल्यानंतर संबंधित प्रकार पाहताच त्यांनी शानूला रूग्णालयात दाखल करून पोलिसांना घटनेची माहिती दिली. 


दूधवाल्याने अनेकवेळा दिला आवाज, प्रतिसाद न मिळाल्यामुळे शेजाऱ्यांना बोलवले

पोलिसांचे म्हणणे आहे की, आरोपीची आर्थिक परिस्थिती ठीक नसल्यामुळे तो त्रस्त होता. आरोपीच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. शेजाऱ्यांच्या मते, मोहनलाल आमि मधु सिंगाल यांना दररोज भेटायला येणार्या लोकांना शानू ते आजारी असल्याचे सांगत गेटवरूनच परत पाठवत होता. गुरुवारी रात्री 8.30 वाजता दूधवाल्याने गेट बंद पाहून बऱ्याचवेळा आवाज दिला. पण कोणी बाहेर आले नाही आणि आतून प्रतिसादही मिळाला नाही. यामुळे त्याने शेजाऱ्यांना बोलवले. लोकांनी गेटमधून आत पाहिले असता मोहनलाल आणि मधु यांचा मृतदेह आढळून आला. तर शानू तपफडत असल्याचे दिसून आले. यानंतर शेजाऱ्यांनी शानूला तत्काळ रूग्णालयात दाखल केले. 


 

 

बातम्या आणखी आहेत...