आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मेक्सिको : मधुमेहग्रस्त पित्यासाठी मुलाने १० वर्षे संशाेधन करून शाेधला साखरेवर पर्याय; स्थूलतेवरही परिणामकारक

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मेक्सिको सिटी - मेक्सिको सिटीत राहणाऱ्या झेव्हियर लाॅगेरेटी या तरुण संशाेधकाने मधुमेहाने पीडित स्वत:च्या वडिलांसाठी असा शाेध लावला, ज्याचा फायदा मेक्सिको सिटीच्या लाखो मधुमेहग्रस्तांनाही हाेणार आहे. या कामगिरीसाठी त्याला गत मेमध्ये २.१५ काेटी रुपयांचे ‘शिवाज व्हेंंचर अॅवार्ड’ही  मिळाले आहे. 


झेव्हियरला ताे १८ वर्षांचा असताना वडिलांना मधुमेहाचा त्रास असल्याचे कळले. तेव्हा ताे केमिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत हाेता. त्या वेळी त्याने अभ्यासासह मधुमेहासाठी साखरेला पर्याय शाेधण्याच्या प्रकल्पावर आपले सर्व लक्ष केंद्रित करून टाकले. त्याचे वडील सुक्रालोज व स्टेविया वापरत हाेते; परंतु त्यांची चव त्यांना आवडत नव्हती. त्यामुळे कुटुंबीयांच्या नकळत ते साखरेचे पदार्थ खात असत. त्यावर झेव्हियरने ‘जॉयलिटाल’च्या स्वरूपात पर्याय शाेधला. सनोबर वृक्षाच्या लाकडापासून हे तत्त्व मिळवणे खूप महागडे असल्याने १० वर्षे विविध प्रयाेग करून मक्याच्या टाकाऊ पदार्थांच्या रूपात त्याचाही पर्याय त्याने शाेधला. याचा फायदा पर्यावरणासही हाेणार आहे. कारण मक्याच्या टाकाऊ पदार्थांतून निघणाऱ्या हरितगृहे वायूंमुळे पर्यावरण प्रदूषित होत हाेते. झेव्हियरने आता ‘जिलिनेट’ नावाने कंपनी सुरू केली असून, त्या माध्यमातून ताे शेतकऱ्यांकडून मक्याचे टाकाऊ पदार्थ खरेदी करून जॉयलिटॉल बनवत आहे. याचा वापर साखरेला पर्याय म्हणून हाेताेय व शीतपेयांतही ते वापरले जातेय. या शाेधामुळे लपूनछपून गाेड पदार्थ खावे लागत नसल्याने झेव्हियरचे वडील आता आनंदी आहेत.  

 

मक्याच्या टाकाऊ पदार्थांपासून बनवले जॉयलिटॉल; पेटंटसाठी नाेंद
झेव्हियरने पर्याय म्हणून जॉयलिटॉलचा वापर केला. हे तत्त्व सनोबरच्या वृक्षापासून मिळते. नैसर्गिकरीत्या गाेड असल्याने यास च्युइंगम आदीसाठी वापरले जाते. याची चव साखरेसारखी असते; परंतु याचे उत्पादन करणे महाग असल्याने झेव्हियरने १० वर्षे संशोधन करून मक्याच्या टाकाऊ पदार्थांपासून जॉयलिटाल बनवले व याच वर्षी या उत्पादनास पेटंटसाठी रजिस्टर्डही केले.